दौंड मधून कोरोना आऊट दौंडकर नॉट आऊट, आठ दिवसात रुग्णांची संख्या कमी


दौंड मधून कोरोना आऊट दौंडकर नॉट आऊट, आठ दिवसात रुग्णांची संख्या कमी

विठ्ठल होले पुणे प्रतिनिधी -: दौंड शहरासह तालुक्यात रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे,14/10/20 घेण्यात आलेल्या तपासणीत एकही रुग्ण आढळला नाही,असेच रुग्ण संख्या हळू हळू कमी होऊन दौंड चे जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येताना दिसत आहे, सर्वजण अशीच स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या, आपण कोरोनाला लवकरच हद्दपार करू असे मत डॉ संग्राम डांगे यांनी व्यक्त केले,गेल्या आठ दिवसातील रिपोर्ट दिलासादायक आले आहेत,13/10/20 रोजी 25 जणांची अँटिजेन तपासणी करण्यात आली होती त्यापैकी 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते,त्यामध्ये 6 महिला व 4 पुरुष बाधीत आले होते, त्यापैकी शहरातील 7 ग्रामीण भागातील 3 जण होते,त्यामध्ये 10 वर्षांच्या बालकासह  80 वर्षाच्या जेष्ठां पर्यंत चे व्यक्ती होते,दिनांक 14/10/20 रोजी 36 लोकांचे अँटिजेन तपासणी करण्यात आली होती त्यामध्ये सर्वच्या सर्व 25 जण निगेटिव्ह आले होते,दिनांक 15/10/20 रोजीच्या रिपोर्ट मध्ये 93 जणांची तपासणी करण्यात आली होती त्यापैकी फक्त 6 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या होत्या, 2 महिला आणि 4 पुरुष,शहरातील 4 तर ग्रामीणचे 2 व्यक्ती 25 ते 73 वयोगटातील व्यक्ती होते, मागील दोन महिन्यांपूर्वी शनिवार रविवार च्या सुट्टी नंतर सोमवारी दिडशे ते दोनशे लोकांचे स्वाब घेण्यात येत होते त्यामध्ये 50 ते 60 रुग्ण पॉझिटिव्ह येत होते परंतू जनतेनी घेतलेली सतर्कता,शासनाच्या नियमांचे केलेले पालन यामुळे आता चित्र बदलले आहे,आज सोमवार दिनांक 19/10/20 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण 34 जणांची rapid antigen तपासणी करण्यात आली त्यांचे report अर्ध्या तासात प्राप्त झाले पैकी एकूण फक्त 2 व्यक्तीचे अहवाल positive आले आहेत तर 32 व्यक्ती चे report negative आले आहेत. Positive मध्ये दोन्ही महिला आहेत एकही पुरूष रुग्ण नसल्याचे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले.प्रभाग -दौंड शहर=1,ग्रामीण=1 हे दोन्ही व्यक्ती 24 ते  50 वर्ष वयोगटातील असल्याचे डॉ डांगे यांनी सांगितले आहे. जनतेने असेच सहकार्य करावे,शासनाच्या नियमनांचे असेच काटेकोरपणे पालन करावे आपण लवकरच दौंड मधून कोरोना संसर्ग हद्दपार करू म्हणजे  जनजीवन पूर्वपदावर येईल असे मत डॉ संग्राम डांगे यांनी यावेळी व्यक्त केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News