अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची सरसगट भरपाई दया - सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे


अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची सरसगट भरपाई दया - सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव - सातत्याने विविध संकटांना तोंड देत असतांना काल झालेल्या वादळी वारा व अतिवृष्टीने पुन्हा शेतक-यांना मोठा तडाखा बसला आहे, यामध्ये मोठया प्रमाणात आर्थीक नुकसान झालेले आहे. शासनाने तातडीने या शेतकऱ्यांना नुकसानीची सरसगट भरपाई देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार उध्दवजी ठाकरे साहेब यांचेकडे केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे,महसुल मंत्री बाळासाहेब थोरात,कृषी मंत्री दादाजी भुसे आणि जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे निवदेनाद्वारे केलेल्या मागणीत पुढे म्हटले आहे की, कोपरगाव विधानसभा मतदार संघामध्ये काल दि.18 आक्टोबर 2020 रोजी मोठया प्रमाणात वादळी वा-यासह अतिवृष्टी झाली. काढणीसाठी आलेले सोयाबीन, मका,उस व इतर अनेक पिकांचे मोठी नुकसान झाले, उभी असलेली पिके पुर्णपणे शेतात आडवे झाले.त्यामुळे शेतक-यांवर वारंवार येणा-या संकटात आणखी भर पडली आहे. यावर्पीचा संपूर्ण हंगामच शेतक-यांच्या दृष्टीने नुकसानीचा ठरला आहे. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे आर्थिकदृष्ट्या शेतकरी विवंचेनत सापडला आहे. या कठीण काळात आर्थीक परिस्थिती नसतांनाही पिके उभी केली होती.काल झालेल्या अतिवृष्टीमुळे राहिलेली पिकेही जमीनदोस्त झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचे स्वप्नच धुळीला मिळाले आहे.त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे. हाती काहीही राहिले नसल्याने आज हा जगाचा पोषिंदा आभाळाकडे नजर लावुन बसला आहे, या परिस्थितीत दिलासा देण्यासाठी नुकसानग्रस्त शेतक-यांना तात्काळ सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी सौ कोल्हे यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News