रक्तदात्यांची मोफत कोरोना चाचणी
अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) सर्व राजकीय पक्षांमध्ये मतभेद असताना कोरोनाच्या संकटकाळात आपले मतभेद विसरुन भिंगार मधील सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान व मोफत कोरोना चाचणी शिबीराचे आयोजन केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी घेण्यात आलेल्या या शिबीरास नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. तर रक्तदान करण्यापुर्वी रक्तदात्यांची मोफत एंटीजन किटद्वारे कोरोना चाचणी करण्यात आली.
अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड व भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने नितीन शिंगवी यांनी शिबीरार्थींची मोफत कोरोना चाचणीची सोय उपलब्ध करुन दिली होती. भिंगार येथील कॅन्टोन्मेंट मराठी शालेत झालेल्या शिबीराप्रसंगी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, शिवसेनेचे शहराध्यक्ष सुनील लालबोंद्रे, भाजपाचे वसंत राठोड, वंचित बहुजनचे सागर चाबुकस्वार, काँग्रेसचे शामराव वाघस्कर आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोनाच्या संकटकाळात सर्वच रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. तर शहरासह उपनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सर्व राजकीय पदाधिकार्यांनी हेवेदावे व मतभेद बाजूला ठेऊन भिंगारच्या राजकीय पदाधिकार्यांनी एक वेगळा सामाजिक संदेश देत नागरिकांना सुखद धक्का दिला. यावेळी सर्व राजकीय पदाधिकार्यांनी एकत्र येत हर काम देश के नाम! ही घोषणा दिली. मोफत कोरोना चाचणी उपलब्ध करुन दिल्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांनी आयोजकांचे आभार माणून स्वयंफुर्तीने रक्तदान केले.शिबीराच्या आयोजनासाठी भरत पवार, मतीन सय्यद, मळूराज आवटी, सिद्धार्थ आढाव, किशोर कटारे, बंडू बेंद्रे, संजय गवळी, आसिफ शेख, विशाल बेलपवार, अभिजीत सपकाळ, नसीर शेख, वसीम शेख, अनंत रासने, उमेश शिंदे, संतोष गायकवाड, अॅड. शितल बेंद्रे, कांता बोटे, संगीता घोडके पुढाकार घेतला होता. शिबीर यशस्वी करण्यासाठी जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे डॉ. इंगोले, माया कोल्हे, ज्ञानेश्वर मगर तर कोरोना चाचणीसाठी भारतीय जैन संघटनेचे आदेश चंगेडिया, प्रशांत गांधी, प्रतीक्षा जगदाळे, कीर्ती भापकर, आजिनाथ वांढेकर, अक्षय कानडे यांनी सहकार्य केले.
रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी भिंगार मधील सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत रक्तदान शिबीर घेतले. यावेळी भगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, शिवसेनेचे शहराध्यक्ष सुनील लालबोंद्रे, भाजपाचे वसंत राठोड, वंचित बहुजनचे सागर चाबुकस्वार, काँग्रेसचे शामराव वाघस्कर, नितीन शिंगवी, भरत पवार, मतीन सय्यद, मळूराज आवटी, सिद्धार्थ आढाव, किशोर कटारे, बंडू बेंद्रे, संजय गवळी, आसिफ शेख, विशाल बेलपवार, अभिजीत सपकाळ, नसीर शेख, वसीम शेख, अनंत रासने, उमेश शिंदे, संतोष गायकवाड, अॅड. शितल बेंद्रे आदि. (छाया-साजिद शेख-नगर)