सोमवारी श्रीगोंदयात काँग्रेसची संघटनात्मक बांधणीसाठी बैठक


सोमवारी श्रीगोंदयात काँग्रेसची संघटनात्मक बांधणीसाठी बैठक

श्रीगोंदा प्रतिनिधी (अंकुश तुपे) दि.१८: श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटी व तालुका विद्यार्थी काँग्रेस यांची संघटनात्मक बांधणी या विषयावर सोमवार दि. १९ ऑक्टोंबर रोजी

सोनिया गांधी तंत्रनिकेतन श्रीगोंदा येथे सकाळी १० वा.बैठक आयोजित केली आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या सूचनेनुसारही बैठक आयोजित केली आहे. काँग्रेस पक्षाची गावोगाव बांधणी, मजबुतीकरण,पक्षाचे ध्येय धोरणे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचणे.ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यामध्ये पक्षाची मजबूत पकड ठेवणे, कर्तुत्ववान तरुणांना संधी देणे याविषयी चर्चा होणार आहे.

         ही बैठक महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सरचिटणीस अनुराधाताई नागवडे, नगराध्यक्षा शुभांगीताई पोटे ,माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, जिल्हा उपाध्यक्ष केशवभाऊ मगर, धनसिंग पाटिल भोईटे, जिल्हा सरचिटणीस संजय महांडूळे, बाळआप्पा पाचपुते, जिल्हा सचिव आसिफभाई इनामदार , सह सचिव ज्ञानदेव गवते ,नगरसेवक प्रशांत गोरे, सतीश मखरे, समिर बोरा, गणेश भोस, राजाभाऊ लोखंडे, निसार बेपारी, संतोष कोथांबिरे व नगर , पारनेर, कर्जत समन्वयक स्मितलभैय्या वाबळे,राम जाधव, शरद खोमणे, स्वप्नील लाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिपक भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News