भैरवनाथ जोगेश्वरी युवा प्रतिष्ठान तर्फे परीचारीकांचा सत्कार!!


भैरवनाथ जोगेश्वरी युवा प्रतिष्ठान तर्फे परीचारीकांचा सत्कार!!

संजय भारती, प्रतिनीधी

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील रहीवासी तसेच साईबाबा संस्था शिर्डी येथील कोविड सेंटरमध्ये सेवेत असलेल्या मोनिकाताई सतीश चव्हाण व मिनाक्षीताई जाधव यांचा श्रीं.भैरवनाथ जोगेश्वरी युवा प्रतिष्ठानचे वतीने चांदेकसारे येथे सत्कार करण्यात आला. 

आज करोना कोवीड 19 सारख्या गंभीर महामारी मध्ये मिनाक्षीताई जाधव व मोनिका ताई चव्हाण यांनी श्री साईबाबा संस्थान,शिर्डी येथील कोविड सेंटर मध्ये कोरोना बाधित रुग्णांची सेवा केली असुन आज त्या आपले कर्तव्य बजावून व होम कॉरंटाइनचा काळ संपवून आपल्या घरी परतआल्या आहेत. त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून आज श्री भैरवनाथ जोगेश्वरी युवा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, या प्रसंगी श्री शंकरराव चव्हाण, मधुकर होन,किरण होन,सागर होन,नितीन होन,दादासाहेब होन, सचिन होन,प्रवीण होन,सतिष चव्हाण,रविंद्र होन,सुधाकर होन हे उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News