जिल्हा उद्योगचे कर्ज प्रकरणे निकाली काढण्याचे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे आश्‍वासन!! छावा क्रांतिवीर सेनेच्या आंदोलनाला यश! उपोषण मागे


जिल्हा उद्योगचे कर्ज प्रकरणे निकाली काढण्याचे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे आश्‍वासन!!  छावा क्रांतिवीर सेनेच्या आंदोलनाला यश! उपोषण मागे

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) जिल्हा उद्योग केंद्र महामंडळाच्या कर्ज प्रकरण व सबसिडीत बँक मॅनेजर कडून अडवणूक होत असल्याने लाभार्थींनी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने मंजूर कर्ज व सबसिडी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजल सर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण केले होते. या उपोषणाची प्रशासनाने दखल घेत संबंधीत बँकांना कळविल्याने सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने व्यवस्थापक संदीप वालवलकर यांनी जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकरणे 15 दिवसात करुन देण्याचे लेखी आश्‍वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, दिपक चव्हाण, विशाल काळे, बबन वाघुले, प्रतिक मानकर, अशोक झरेकर, अरुण आढाव, रावसाहेब झरेकर, विजय पाटोळे, महादेव कांबळे आदि लाभार्थी उपस्थित होते.

जिल्हा उद्योग केंद्र महामंडळाच्या कर्ज प्रकरणात बहुतेक बँका लाभार्थींना वर्षानुवर्ष त्रास देण्याचे काम करीत आहे. संपुर्ण कार्य प्रणालीमध्ये पारदर्शक कामे होत नाही. मात्र लाभार्थ्यांची अडवणूक केली जात आहे. लाभार्थी जवळचे पैसे खर्च करून उद्योगवाढीसाठी खर्च करतात. यात बँक मॅनेजर आडकाठी उभी करीत असून, याचा फटका बेरोजगार, शेतकरी कामगार यांना बसत आहे. प्रकरण मंजूर होण्यासह सबसिडी मिळण्यापर्यंत इंडियन ओवरसीज बँक (शेंडी), महाराष्ट्र बँक (अकोळनेर) आदि बँकचे मॅनेजर लाभार्थींना नाहक चकरा मारयला लावत असल्याने छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने उपोषण करण्यात आले होते.जिल्हा उद्योग केंद्राचे बँके कडून मंजूर कर्ज व सबसिडी मिळण्यासाठी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजल सर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यात आले होते. या उपोषणाची दखल घेत सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने व्यवस्थापक संदीप वालवलकर यांनी लेखी आश्‍वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, दिपक चव्हाण, विशाल काळे, बबन वाघुले, प्रतिक मानकर, अशोक झरेकर, अरुण आढाव, रावसाहेब झरेकर, विजय पाटोळे, महादेव कांबळे आदि लाभार्थी.  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News