नेता सुभाष चौक येथे श्री साई हॉस्पिटलचा शुभारंभ


नेता सुभाष चौक येथे श्री साई हॉस्पिटलचा शुभारंभ

 नेता सुभाष चौक येथील श्री साई हॉस्पिटलचा शुभारंभ युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी डॉ.दिलीप पवार, डॉ.परमेश्‍वर काळे, डॉ.विनय मेहेत्रे, डॉ.राहुल भोसले, डॉ.दिपक शिंदे, डॉ.ज्ञानेश्‍वर तळेकर, डॉ.अदित्य फडके, दिलीप सातपुते, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, गिरिष जाधव, रमेश खेडकर आदि. (छाया : राजु खरपुडे)    

चांगले उपचार मिळाल्यास रुग्णांचे दु:ख कमी होईल - विक्रम राठोड

नगर -(प्रतिनिधी संजय सावंत) शहराच्या मध्यवस्तीत सुरु होत असलेल्या श्री साई हॉस्पिटलमुळे परिसरातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे. आज आरोग्यबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती होत आहे, ही चांगली बाब आहे. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. आजच्या कोरोनाच्या काळात आरोग्यसेवेचे महत्व सर्वांनाच कळले आहे.  या हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टर आलेल्या रुग्णांना चांगली सेवा उपलब्ध करुन देऊन त्यांचे दु:ख कमी करण्याचे काम करतील. सामाजिक दृष्टीकोनातून सर्वसामान्यांना माफक दरात उपचार करुन डॉक्टरांनी रुग्णांना दिलासा देण्याचे काम करावे. तसेच विविध शिबीराच्या माध्यमातून त्यांची आरोग्य सेवा उपलब्ध करुन द्यावी. यासाठी आपणास सर्वोतोपरि सहकार्य करु, असे प्रतिपादन युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांनी केले. नेता सुभाष चौक येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या श्री साई हॉस्पिटलचा शुभारंभ युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी डॉ.दिलीप पवार, डॉ.परमेश्‍वर काळे, डॉ.विनय मेहेत्रे, डॉ.राहुल भोसले, डॉ.दिपक शिंदे, डॉ.ज्ञानेश्‍वर तळेकर, डॉ.अदित्य फडके, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, गिरिष जाधव, रमेश खेडकर आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी परमेश्‍वर काळे म्हणाले, या परिसरात एक अद्यावत हॉस्पिटल आम्ही सुरु करुन रुग्णांची अत्याधुनिक सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. या हॉस्पिटलमध्ये पूर्णवेळ फिजिशियन, अतिदक्षता विभाग, कृत्रीम श्‍वसन मशिन, बायपॅप सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम, मशिनरीयुक्त लॅब, एक्स-रे मशिनसह 24 तास मेडिकलची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे रुग्णांना अनेक सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहेत.    प्रास्तविकात डॉ.दिलीप पवार म्हणाले, आज रुग्णांना चांगली सेवा मिळावी, यासाठी या हॉस्पिटलच्या माध्यमातून विविध आरोग्य सेवा आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे रुग्णांच्या आजाराचे लवकर निदान होऊन उपचार करणे सोपे होणार आहे. हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित स्टाफ असल्याने रुग्णांना चांगली सेवा मिळेल, असे सांगितले.यावेळी विविध विभागांचा सौ.संजीवनी फडके, श्रीमती लक्ष्मी भोसले, श्रीमती शामा शिंदे, सौ.यमुना तळेकर, सौ.लंकाबाई कर्डिले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.


     यावेळी डॉ.गुंजाळ, डॉ.मोहोळे, डॉ.पोपट कर्डिले, डॉ.भाऊसाहेब खिलारी, डॉ.प्रशांत महांडूळे, डॉ.गहिनीनाथ खेडकर, नागरदेवळेचे सरपंच राम पानमळकर, नगरसेवक शाम नळकांडे, मनोज चव्हाण, संतोष लवांडे, समीर बेग, निलेश लडकत, शशांक गोरे, गंगाराम शिंदे, वैभव जाधव, किरण बोरुडे, संतोष खेडकर, चंद्रशेखर गोरे, डॉ.शुभांगी शिंदे, वंदना खेडकर आदि उपस्थित होते.


     यावेळी डॉ.राहुल भोसले यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ.विनय मेहेत्रे यांनी सर्वांचे आभार मानले.
 


    

जाहिरात
Search
विडिओ
Recent News