सोमवार पासुन कोपरगावचा जनावरे आठवडे बाजार सुरू !! संभाजीराव रक्ताटे


सोमवार पासुन कोपरगावचा जनावरे आठवडे बाजार सुरू !! संभाजीराव रक्ताटे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील सात महिन्यापासून बंद असलेला सोमवारचा जनावरे आठवडे बाजार सोमवार दिनांक 19 /10/ 2020 पासून पूर्ववत सुरू होत असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संभाजीराव रक्ताटे यांनी दिली आहे कोरोनाच्या संकटाची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असली तरी कोरोना संकट  अद्याप संपलेले नाही त्यामुळे  जनावरे बाजारात जनावरे विक्रीसाठी व खरेदीसाठी येणाऱ्या शेतकरी व्यापारी तसेच दलाल ट्रक टेम्पो पिक अप रिक्षा चालक हातगाडीवाले हॉटेल वाले यांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे तसेच सोशल डिस्टंसिंग ठेवावे तसेच तोंडाला मास्क असल्याशिवाय बाजारात प्रवेश मिळणार नाही ज्या व्यक्तीच्या तोंडात मास्क अथवा रुमाल बांधलेला नसेल त्या व्यक्तीस जागेवर पाचशे रुपयाचा दंड तात्काळ भरावा लागेल अन्यथा पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल त्याच प्रमाणे बाजार आवारात पान गुटका तंबाखू खाऊन थुंकण्यास मनाई आहे तसेच पान गुटखा तंबाखू चे स्टॉल लावण्या स मनाई आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी व कोरोना चा प्रसार होणार नाही याची काळजी घ्यावी असे आव्हान बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र निकोले व सन्माननीय संचालक मंडळ यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News