अतिवृष्टीमुळे मदनवाडीतील पिकांचे अतोनात नुकसान ; तात्काळ पंचनामे करा - ना.दत्तात्रय भरणे


अतिवृष्टीमुळे मदनवाडीतील पिकांचे अतोनात नुकसान ; तात्काळ पंचनामे करा -   ना.दत्तात्रय भरणे

भिगवण ( प्रतिनिधी ) नानासाहेब मारकड 

अतिवृष्टीमुळे भिगवण परिसरातील शेकडो हेक्टर पिकांच्या नुकसानाची आणि अतिवृष्टीने फुटलेल्या मदनवाडीच्या ब्रिटिशकालीन तलावाची पहाणी करुन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

     भिगवण परिसरातील मदनवाडी, पोंधवडी,अकोले, काझड, शेटफळ गढे, लाकडी निंबोडी आदी गावांतील शेकडो हेक्टर वरील उस केळी डाळिंब पिकांच्यासह घरे आणि गोट्यांचे नुकसान झाले आहे पावसाची तिव्रता अधिक असल्याने पाणि वाहिल्यामुळे शेताचे बांध फुटुन वाहिले आहेत तर अनेक शेतकऱ्यांचे शेतच वाहुन गेले आहे याचे देखील पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी जिल्हा परिषद सद्स्य हनुमंत बंडगर यांनी केली. 

       मदनवाडीचा तलाव इंदापूर आणि बारामती तालुक्याच्या सिमेवर असल्याने दोन्ही तालुक्यातील हजारो हेक्टर शेती यावर अवलंबून होती मात्र अतिवृष्टीने तलाव फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे याची पहाणी करुन तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आले. 

      यावेळी खासदार सुप्रिया सुळे, प्रदीप गारटकर,जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर,प्रताप पाटील,तुकाराम बंडगर,धनंजय थोरात,विष्णुपंत देवकाते,नामदेव बंडगर,गणपत ढवळे, सुरज बंडगर,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेडगे, तहसीलदार सोनाली मेटकरी,भिगवण पोलीस स्टेशन स.पो.निरिक्षक जीवन माने उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News