मढेवडगाव येथे साध्या पध्दतीने नवरात्र उत्सव


मढेवडगाव येथे साध्या पध्दतीने नवरात्र उत्सव

अंकुश तुपे श्रीगोंदा प्रतिनिधी :

दि.१७:  मढेवडगाव ता. श्रीगोंदा येथील आदर्श कला, क्रिडा व ग्रामविकास प्रतिष्ठाण हे गेल्या वीस वर्षांपासून नवरात्र उत्सव साजरा करते. घटस्थापने पासून दसरा महोत्सवापर्यंत दहा दिवस  मढेवडगाव फेस्टिव्हल  आयोजित करून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते.देवीची मिरवणूक व घटस्थापना, क्रिडा स्पर्धा, पायी दिंडी सोहळा,किर्तन, भजन, आराध्यांचा मेळा,शालेय विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा, अनेक सामाजिक उपक्रम, वृक्षारोपण,सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस आदर्श ग्रामभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते या कार्यक्रमांसाठी गावातील वाड्या-वस्त्यांवरील तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.मढेवडगावचा उत्सव संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.

      परंतु यावर्षी आलेल्या कोरोना महामारी संकटामुळे उत्सवाला मर्यादा आल्या आहेत. प्रशासनाने दिलेल्या नियमावली पाळून यंदा अत्यंत साधेपणाने उत्सव साजरा करण्यात येत आहे. आदर्श प्रतिष्ठाणने यावेळी फक्त देवीच्या सुविद्य मूर्तीची प्रतिष्ठापना करून घटस्थापना केली आहे. सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा देऊन नऊ दिवस फक्त देवीची आरती व पूजा केली जाणार आहे.आरोग्य विषयक काळजी घेऊन सण साजरा केला जात आहे. शनिवार दि.१७ रोजी प्रतिष्ठाणच्या मोजक्या प्रतिनिधींनी देवीची प्रतिष्ठापना व घटस्थापना केली. नवदाम्पत्य श्री. अविनाश रावण उंडे व सौ. कोमल अविनाश उंडे यांच्या हस्ते सपत्नीक देवीची पूजा व घटस्थापना करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विजय उंडे (पत्रकार)  मार्गदर्शक सुनील उंडे,माजी उपसरपंच कल्याणी गाढवे,अनिल उंडे,तंटामुक्ती अध्यक्ष सचिन उंडे,अमोल गाढवे,महेंद्र उंडे, सचिन शिंदे,ग्रा.पं.सदस्य लक्ष्मण मांडे,काळूराम ससाणे,सौ.सोनाली गाढवे,दादा राऊत,प्रफुल्ल वाबळे, राजूकाका कुलकर्णी,गीताराम गोंधळी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News