देऊळगाव गाडा येथे बंधाऱ्याचा भराव फुटून झालेल्यां. नुकसानीची पाहणी करताना आमदार राहुल कुल.
विठ्ठल होले पुणे प्रतिनिधी:
दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथे बंधाऱ्याचा भराव फुटून या बंदरातील पाणी लगतच्या शेतात जाऊन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या घटनेची माहिती मिळताच आमदार राहुल कुल यांनी पहाणी करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचा सूचना तालुका कृषी अधिकारी यांना दिल्या आहेत. कालच्या पावसामुळे देऊळगाव गाडा येथील बंधाऱ्याचे भराव फुटल्यामुळे बंधाऱ्याच्या शेजारील शेतात पाणी शिरून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे .चालू वर्षी जून महिन्यापासून पाऊस पडत आहे,दौंड तालुक्यात मागील काही दिवसापासून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे शेतातील पिके पिवळी पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहे आशा परिस्थितीत शेतीचे नुकसान झाले आहे,त्यामुळे झालेल्या नुकसानीचे बारकाईने पंचनामे करून मदतीसाठी प्रस्ताव तयार करा व भविष्यात या बंधाऱ्यात पाणी साठवले जावे. यासाठी या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करा, असे डि डि बारवकर यांनी म्हंटले आहे.
यावेळी नामदेव नाना बारवकर,मुंडे साहेब, डि डि बारवकर, रवींद्र जामकर,आनंद विधाटे,केशव बारवकर,साहेबराव बारवकर आदि उपस्थित होते.