सोनवडी येथील शेतकरी वर्ग आणि छोट्या मोठ्या उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान


सोनवडी येथील शेतकरी वर्ग आणि छोट्या मोठ्या उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान

सुरेश बागल, कुरकुंभ प्रतिनिधी : दौंड तालुक्यात मोठया पावसामुळे शेतकरी वर्ग आणि छोट्या मोठया उद्योजगांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.भीमा नदी काठी असलेल्या विटभट्ट्यांचे देखील नुकसान झाले आहे. सोनवडी, लिंगाळी, खोरवडी, मेरगळवाडी, येडेवाडी या गावांमध्ये पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दौंड तालुक्यातील लिंगाळी, गोपाळवाडी, गिरीम, खोरवडी इ. ठिकाणी ज्वारी, ऊस, पडवळ, मका आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील भराव फुटला आहे, लाईटचे पोल पडलेले आहेत, झाडे पडलेली आहेत, काही शेतकऱ्यांची जनावरे मेलेली आहेत. अशा प्रकारे शेतकरी आणि छोट्या - मोठ्या उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसान झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती ढासळली आहे, तरी नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाकडे मागणी होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News