दौंड शहरातील व्यवसायिकांची परिस्थिती इकडे आड तिकडे विहीर,अंतर्गत रस्ते आणि कोरोना यांच्या विळख्यात करतायेत व्यवसाय गांधी चौकातील हे बोलके चित्र


दौंड शहरातील व्यवसायिकांची परिस्थिती इकडे आड तिकडे विहीर,अंतर्गत रस्ते आणि कोरोना यांच्या विळख्यात करतायेत व्यवसाय गांधी चौकातील हे बोलके चित्र

विठ्ठल होले पुणे प्रतिनिधी :

दोन वर्षांपासून दौंड शहरातील अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू आहेत तेव्हा पासून व्यवसायावर कमालीचा परिणाम झाला आहे, जेष्ठ नागरिक,महिला विध्यार्थी यांचे अपघात झाले,या खड्ड्याच्या रस्त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहक शहरात येण्याचे टाळत होते,या रस्त्यावरील राडारोडा,कामात वापरली जाणारी मशनरी,धूळ यामुळे व्यवसाय धूळखात पडले होते, त्यात भरीस भर म्हणून की काय ही कोरोनाची महामारी येऊन धडकली आणि उरले सुरले व्यवसाय ही बंद करण्याची वेळ आली,मार्च पासून आतापर्यंत जे पण सणवार झाले ते साधे पणानेच झाले,आता नवरात्र उत्सवाचे वेध लागले होते तर परतीच्या पावसाने त्याच्यात विरझन घातले आहे, आज नवरात्री उत्सवाला घटस्थापणेने सुरवात झाली,गांधी चौकात घटसथापणेच्या सर्व वस्तू उपलब्ध होतात त्यामुळे तेथे गर्दी होते आणि हे सर्वसृत आहे तरीही रस्त्याच्या अर्धवट कामामुळे व्यवसायिक पावसाच्या पाण्यावर व्यवसाय करीत होते.त्यामुळे व्यवसायिक कोंडीत सापडले आहेत, त्यांची परिस्थिती इकडे आड तिकडे विहीर अशीच आहे, याला जबाबदार कोण अर्धवट रस्ते,कोरोना,परतीचा पाऊस हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News