संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.
कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील ह.भ.प.परशुराम महाराज अनर्थे यांची अखिल वारकरी संघाच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड झाली असुन निवडीचे पत्र संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.यशवंत महाराज फाले यांचे कडुन नुकतचे प्राप्त झाले आहे
भोजडे येथे अनेकवर्षापासुन ह.भ.प. परशुराम महाराज अनर्थे यांचे आश्रामात ज्ञानदानाचे कार्य सुरू असुन भगवत भक्तीपासुन भरकटलेल्या समाज्याला दिशा देण्याचे पुण्यकर्म ते अनेक वर्षांपासून करत आहेत.
आपल्या कथाकीर्तनातुन त्यांनी समाजातील अनेक अनिष्ट रूढी,परंपरांवर यांच्यावर कठोर हल्ला चढवला असुन समाज जागृतीचे काम ते या माध्यमातुन करत आहेत.तसेच भोजडे येथील वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातुन त्यांनी अनेक गुणी विद्यार्थी घडवले आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेत वारकरी संघाने त्यांची उत्तर महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे या निवडीबद्दल
जेऊर कुंभारी येथील भजनी मंडळ, व डाऊच भजनी मंडळ तसेच जेऊर कुंभारी ग्रामस्थांच्या वतीने ,शाल व श्रीफळ व पुष्पहार देउन विश्वनाथ राहाणे यांनी त्यांचा सत्कार केला. या वेळी भानुदास वक्ते,किरण वक्ते,प्रकाश वक्ते,गणेश दहे,संतोष पवार,भास्कर चव्हाण, कानिफ वक्ते,आशोक जाधव, माऊली देवकर,वसंत दांदाडे, प्रा.मधुकर वक्ते,आदी उपस्थित होते. या प्रसंगी सत्कार मुर्ती अनर्थे महाराज यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किरण वक्ते यांनी केले.