विठ्ठल होले पुणे प्रतिनिधी :
-पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट,मुबंई यांच्या वतीने दौंड तालूक्यासाठी देण्यात आलेल्या राष्ट्रवादी रूग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते पुणे येथे संपन्न झाला.यावेळी खासदार डाॅ.अमोल कोल्हे उपस्थित होते.
दौंड तालुक्यातील सामन्य नागरिकांकरिता ही रूग्णवाहीका उपलब्ध असेल,असे यावेळी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांनी सांगितले,उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ अमोल कोल्हे यांचे वीरधवल जगदाळे यांनी आभार व्यक्त केले, यावेळी मान्यवर उपस्थित कार्यकर्ते होते.