कोकमठाण येथे विविध विकास कामांचे भुमीपुजन संपन्न !!


कोकमठाण येथे विविध विकास कामांचे भुमीपुजन संपन्न !!

कोकमठाण येथे विविध विकासकामांचे भूमीपूजन प्रसंगी बोलतांना आमदार आशुतोष काळे.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

 जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेला विकास काय असतो याची अनुभूती आली. विकासकामे करतांना सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांनी अंग झोकून केलेल्या कामामुळे विकासाचे नवे पर्व ग्रामीण भागात सुरु झाले त्या विकासाच्या कामाची पोहोच पावती तालुक्यातील सुजाण मतदारांनी मला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दिली आहे. यामध्ये कोकमठाणच्या सुजान मतदारांचा देखील वाटा असून कोकमठाणच्या विकासाचा आलेख यापुढेदेखील असाच चढता ठेवणार असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

            कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे जिल्हा परिषद सदस्या सौ.सोनाली साबळे यांच्या स्थानिक विकास निधीतून अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्र अंतर्गत मुस्लीम कब्रस्तान वाल कंपाऊंड व सुशोभिकरण खर्च ५ लक्ष,समाज कल्याण विभाग मार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर मध्ये बंदिस्त गटार खर्च ७ लक्ष रुपये, जिल्हा नियोजन अंतर्गत शाळा खोली बांधकाम खर्च ८लक्ष,शाळा कंपाऊंड दुरुस्ती २ लक्ष व जनसुविधा योजने अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारत भूमिपूजन ९ लक्ष रुपये अशा एकून ३१ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या सौ.सोनाली साबळे होत्या.

यावेळी बोलतांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम म्हणाले कि, कोकमठाण ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीसाठी ९ लाख रुपये निधी हा आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली साबळे यांच्या निधीतून जिल्हा परिषदेकडून मिळाला आहे. मात्र ज्यांना आमदार निधी, जिल्हा परिषद निधी, ग्रामपंचायत निधी काय असतो ते माहित नसणाऱ्या व नेहमीच दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याची सवय लागलेल्या विरोधकांनी हे श्रेय घेण्याचा देखील केविलवाणा प्रयत्न केला आहे. ज्यांना मागील पाच वर्षात ग्रामपंचायत कार्यालय जवळच्या काट्या काढता आल्या नाही त्यांच्याकडून विकासाची अपेक्षा करणे चुकीचे असून भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत सत्तांतर झाल्याशिवाय राहणार नाही

याप्रसंगी पंचायत समिती सभापती सौ.पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुन काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,जिल्हा परिषद सदस्या सौ.सोनालीताई साबळे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार,गटविकास अधिकरी सचिन सूर्यवंशी,उपअभियंता उत्तमराव पवार,गटशिक्षण अधिकारी श्री.काळे,प्रशासक आर.टी. दिघे,ग्रामसेवक डी. बी. गायकवाड, दादासाहेब साबळे,  सुदाम लोंढे,महेश लोंढे,भीमराज रक्ताटे, ज्ञानेश्वर रक्ताटे, बाळासाहेब राऊत,विजय रक्ताटे, अविनाश निकम,सुभाष लोंढे, अजित रक्ताटे,विशाल जाधव, सौ.उषाताई दुशिंग,प्रकाश देशमुख, दीपक रोहोम,संजय थोरात,सोपान काशीद,दिलावर सय्यद,बंटी सय्यद आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दीपक रोहोम यांनी केले तर आभार सुनील लोंढे यांनी मानले.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News