डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे माध्यमातून गरजू रुग्णांना आधार - आमदार आशुतोष काळे


डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे माध्यमातून गरजू रुग्णांना आधार - आमदार आशुतोष काळे

डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे लोकार्पण प्रसंगी आमदार आशुतोष काळे व मान्यवर.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोरोना बाधित गंभीर रुग्णांच्या सेवेसाठी डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे लोकार्पण .

कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली होती.काही रुग्ण अंत्यवस्थ झाल्यामुळे पुढील उपचार घेण्यासाठी त्यांना खाजगी रुग्णालयात जावे लागले होते. त्यामध्ये त्या रुग्णांना मोठा आर्थिक भार सोसावा लागला होता व दुर्दैवाने काही रुग्णांचे निधन देखील झाले होते. मात्र यापुढे गंभीर रुग्णांना उपचार घेण्यासाठी इतर तालुक्यात जाण्याची वेळ येणार नाही.गंभीर रुग्णांना डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती होण्यासाठी अद्यावत रुग्णवाहिका देखील लवकरच देण्यात येणार आहे. डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये सामान्य व अत्यवस्थ रुग्णांवर तज्ञ डॉक्टर उपचार करणार आहेत.त्यामुळे निश्चीतपणे यापूर्वी वाढलेला मृत्यूदर घटण्यास मदत होणार असून गरजू रुग्णांना आधार दिल्याचे समाधान वाटत असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

                          आमदार आशुतोष काळे यांच्या स्थानिक स्थानिक  निधीतून १६ ऑक्सिजन बेड, २ व्हेंटीलेटर मशीन व २ बायपॅप मशीन, मॉनिटर, २० के.व्ही.जनरेटर सुविधासह युक्त असलेल्या गंभीर कोविड रुग्णालयासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व साहित्यांनी परिपूर्ण असलेल्या डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

         ते पुढे म्हणाले कि, कोपरगाव तालुक्यातील अनेक रुग्णांना डायलिसीससाठी शेजारच्या तालुक्यात जावे लागत असे. यापुढे अशा रुग्णांना डायलिसीस सुविधा कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातच उपलब्ध होणार असून ग्रामीण रुग्णालयाला डायलिसीस मशीन देण्यात आले असून तज्ञ डॉक्टरांची नेमणूक केली आहे. भविष्यात अजूनही आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांचे आरोग्य आबाधित राहावे यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी कोपरगाव तालुक्याला ट्रॉमा केअर सेंटर व उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी प्रस्ताव पाठविला होता. त्याबाबत पाठपुरावा सुरु असून निधी उपलब्ध होताच उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न निश्चितपणे सुटणार असा आशावाद आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केला.

          याप्रसंगी तहसीलदार योगेश चंद्रे,पंचायत समिती सभापती सौ.पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुन काळे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक पद्मकांत कुदळे, संजय आगवन,पंचायत समिती सदस्य श्रावण आसने,मधुकर टेके,कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे,अजीज शेख,सुनील शिलेदार,राजेंद्र वाकचौरे, राजेशजी ठोळे,रोहित वाघ, विजय बंब,डॉ.अजय गर्जे, आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ.मयूर जोर्वेकर, निमाचे अध्यक्ष व राष्ट्रवादी डॉ.सेलचे अध्यक्ष डॉ. तुषार गलांडे,डॉ.अजमेरे,डॉ. योगेश कोठारी,डॉ. मुळे,डॉ. अतिष काळे,युवकअध्यक्ष नवाज कुरेशी,फकीरमामु कुरेशी,रमेश गवळी,दिनकर खरे,धरमशेठ बागरेचा,सुनील बोरा,मुकेश ठोळे, अशोक खांबेकर,तुषार पोटे,मनोज कपोते,आदिनाथ ढाकणे,संतोष गंगवाल,सुनील फंड,अनिल गायकवाड,सतीश काकडे,डॉ रणदिवे,डॉ. क्षीरसागर,निखिल डांगे,बाला गंगूले,सागर लकारे,वाल्मिक लहिरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक आदी उपस्थित होते.- 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News