छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीगोंदा येथील कोविड सेंटरमध्ये फळ वाटप करण्यात आले


छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीगोंदा येथील कोविड सेंटरमध्ये फळ वाटप करण्यात आले

विठ्ठल होले प्रतिनिधी:

श्रीगोंदा - महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगनराव भुजबळ यांनी दोन दिवसांपूर्वीच सर्व कार्यकर्त्यांना वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले होते त्याप्रमाणे सर्वत्र तशाच पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला आहे, श्रीगोंदा येथेही डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृह येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना फळे वाटप करून साजरा करण्यात आला, यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या जिल्हा अध्यक्षा संगीताताई खामकर,संगीताताई भुजबळ तालुका अध्यक्ष संजय डाके,नगरसेवक राजू गोरे,नगरसेवक शहाजी खेतमाळीस,ओबीसी चे युवा नेते गोरख आळेकर,सुभेदार मल्हारराव होळकर,सामाजिक संघटनेचे संस्थापक आदेश शेंडगे पाटील,शरद श्रीराम,शंकर भुजबळ,किरण श्रीराम तसेच समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News