दाैंड शुगर शेतक-यांच्या हितासाठी वचन बद्ध - सुनेत्राताई पवार


दाैंड शुगर शेतक-यांच्या हितासाठी वचन बद्ध - सुनेत्राताई  पवार

कुरकुंभ:प्रतिनिधी, सुरेश बागल

                                   दाैंडशुगर कारखाण्याचा बाॅयलर अग्नि प्रदिपन कार्यक्रम संपन्न झाला. दाैंड शुगर कारखाण्याच्या १२ व्या ऊस गाळप हंगामाचा(२०२०- २१)शुभारंभ बारामती  टेक्स्टाईलच्या अध्यक्षा सुनेत्राताई पवार  यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.तर  कारखाण्याचे बाॅयलर अग्नि प्रदिपन दाैंड शुगरचे जेष्ठ संचालक विरधवल जगदाळे व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. संगिताताई जगदाळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी  कारखाण्याचे चेअरमन जगदीश कदम हाेते. याप्रसंगी बोलताना सुनेत्राताई पवार म्हणाल्या की,दाैंड शुगरने अत्यंत कमी कालावधीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.ऊस उत्पादक शेतक-यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही वचनबद्ध राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.

जेष्ठ संचालक विरधवल जगदाळे म्हणाले की,दाैंड शुगर कारखाण्याने ऊस उत्पादक शेतक-यांचे हित जाेपासत  असताना संचालक मंडळ, अधिकारी,व  कर्मचारी,यांनी शेतक-यांचे एकरी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयाेग राबवून शेतक-यांचे आर्थिक उत्पादन वाढविण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला  आहे.त्यामुळे शेतक-यांमध्ये दाैंड शुगर कारखाण्या बाबत आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे.आम्ही ताे जपण्यासाठी कायमस्वरूपी वचनबद्ध आहाेत.अशी भावना त्यांनी व्यक्त केली.कारखाण्याचे चेअरमन जगदीश कदम म्हणाले की,कारखाण्याने मागील ऊस गाळप हंगामाचे शेतक-यांना २७०० रुपये मेट्रिक टनाप्रमाणे ऊस दर दिला आहे.एफआरपी प्रमाणे येणारी रक्कम दिवाळीच्या दरम्यान ऊस उत्पादकांना अदा करण्यात येईल.या चालू गाळप हंगामात १० लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवलेले आहे.जास्तीत जास्त शेतक-यांनी आपला ऊस दाैंड शुगर कारखाण्याला गाळपासाठी देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी इंद्रजीत जगदाळे, सुभाष नागवे, लक्ष्मण कदम, अमित गिरमकर, वसंत धुमाळ, पाेपट खाेमणे, विठ्ठल जगदाळे, नंदू कदम, परमेश्वर गायकवाड, दत्तात्रय पाचपुते, व माेठ्या  संखेने शेतकरी उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार कारखान्याचे  पूर्णवेळ संचालक शहाजीराव गायकवाड यांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News