श्री फिरंगाई मातेचा नवरात्र उत्सव कोरोना संसर्ग प्रादुर्भावामुळे रद्द करणार देवीची पूजा ,आरती होईल: मुख्य विश्वस्त राहुल कुलकर्णी


श्री फिरंगाई मातेचा नवरात्र उत्सव कोरोना संसर्ग प्रादुर्भावामुळे रद्द करणार देवीची पूजा ,आरती होईल: मुख्य विश्वस्त राहुल कुलकर्णी

सुरेश बागल दौंड प्रतिनिधी:

कुरकुंभ (ता .दौंड) येथील श्री फिरंगाई देवीचा नवरात्र उत्सव करोना संसर्ग विषाणू प्रादुर्भाव टाळण्यासाठी रद्द केल्याची आणि भाविकांसाठी मंदिर शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत बंद राहील ,अशी माहिती श्री फिरंगाई देवी देवस्थान चे मुख्य विश्वस्त राहुल कुलकर्णी यांनी दिली.दि.१७.१०.२०२० शनिवार पासून श्री फिरंगाई मातेचा यंदाचा नवरात्र उत्सव कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रद्द करण्यात आला आहे .भाविकांना मंदिर दर्शनासाठी बंद आहे ,भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये. पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. शासकीय परवानगी मिळाल्यानंतर मंदिर उघडले जाईल.देवीची पूजा आणि आरती होईल अशी माहिती कुरकुंभ देवी देवस्थान चे मुख्य विश्वस्त राहूल कुलकर्णी यांनी दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News