चांदेकसारे येथे आठवडे बाजार आता सूरू होणार !!


चांदेकसारे येथे आठवडे  बाजार आता सूरू होणार !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावातील आठवडे बाजार दि. १७ /१०/ २०२० रोजी पुर्ववत सूरू करण्यात येणार असल्याची माहीती उपसरपंच विजय होन यांनी दिली आहे

 कोरोना महामारीचा वाढता संसर्ग बघता खबरदारीचा उपाय म्हणुन शासनाने प्रत्येक शहर तसेच गावातील आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार गेली काही महीने आठवडे बाजार बंदच असल्याने बाजारात माल विक्री करणारा व्यावसायिक अडचणीत आला होता तसेच ग्रामपंचायत तसेच नगरपालिका यांचा महसुल बुडाला होता परंतु मा.जिल्हाधिकारी यांनी नुकतीच आठवडे बाजार सुरू करण्यास  परवानगी दिली आहे. या पाश्र्वभुमीवर चांदेकसारे ग्रामपंचायतीने दर शनिवारी भरणारा आठवडे बाजार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असुन या बाजारात सर्व भाजीपाला तसेच किराणा मालाचे व्यापारी व अन्य छोटेमोठे व्यवसायिकांनी सोशल डिस्टिगशनचे नियम पाळत तसेच सॅनिटायझर व मास्कचा वापर करून व्यवसाय करावा.अन्‍यथा आपणा विरूद्ध राष्ट्रिय आपत्‍ती व्‍यवस्‍थापनकायदा २००५ मधील तरतुदी नुसार शिस्‍तभंगाची कारवाई करण्‍यात येईल अशी माहीती माजी सरपंच केशवराव होन यांनी दिली आहे .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News