सोलापूर पुणे हायवेवर दौंड तालुका हद्दीत परतीच्या पावसाचा हाहाकार,दौंड पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनेकांचे वाचले प्राण,चारजण गेले वाहून


सोलापूर पुणे हायवेवर दौंड तालुका हद्दीत परतीच्या पावसाचा हाहाकार,दौंड पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनेकांचे वाचले प्राण,चारजण गेले वाहून

विठ्ठल होले पुणे प्रतिनिधी:

दौंड तालुक्यात परतीच्या पावसाचा हाहाकार,दौंड तालुका हद्दीत पुणे सोलापूर हायवेवर पूर परिस्थिती निर्माण झाली होती, दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, त्यामुळे बऱ्याच जणांचे प्राण वाचवण्यात यश आले, परंतू चार जण वाहून गेले आज सकाळी तिघांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरू असल्याचे सुनिल महाडिक सांगितले आहे.दौंड तालुक्यातील पूर्व भागात काल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी झाली काल केवळ दोन तासांमध्ये खडकी भागामध्ये 165 मिलिमीटर पावसाची नोंद झाली तसा हा भाग पर्जन्यछायेचा असल्यामुळे कधीच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत नाही म्हणून या भागात कधीही पूर परिस्थिती आली नव्हती तरी सुद्धा अपुरे साधन सामग्री असतानासुद्धा दौंड पोलीस ठाण्यात तर्फे तात्काळ प्रतिसाद देऊन स्वामी चिंचोली दत्त कॉलेज च्या समोर पुणे सोलापूर हायवे वर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा लोंढा आला त्यात एसटी व एक बीएमडब्ल्यू कार अडकली त्यातील प्रवाशांना बाहेर काढले तसेच इतर पाच कार सुरक्षित ठिकाणी बाहेर काढण्यात आल्या सदर त्याठिकाणी तात्काळ बेरी कटिंग करून होमगार्ड महामार्ग सुरक्षा पथक व व पोलीस कर्मचारी लावून वाहतूक एकेरी मार्गावर वळवण्यात आली व संभाव्य अपघात टळला त्यानंतर मळद गावच्या शिवारातील छोटा तलाव फुटल्याने पाण्याचा प्रचंड प्रवाह गावात आला व घरात पाणी शिरू लागले त्यावेळेस ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत कॉल देऊन लोकांना सुरक्षित स्थळी हलवले त्यानंतर रावणगाव नंदादेवी खडकी या गावात लोकांना ग्राम सुरक्षा यंत्रणेचा कॉल देऊन सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितले त्यानंतर कुरकुंभ उड्डाणपुलाच्या खाली पाणी तुडुंब भरल्याने त्यात एक पिकअप अडकला त्यात एक माणूस वाहून जात होता एक तासापासून तो पुरामध्ये होता त्याला फायर ब्रिगेड व जेसीबीच्या मदतीने सुखरूप सोडवले त्यानंतर स्वामी चिंचोली या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्या निवासस्थानी एक महिला डॉक्टर व त्यांची दोन नातेवाईक अडकले त्यांना सोडवण्यासाठी फायर ब्रिगेड व आपत्ती व्यवस्थापनाच्या बुट्टी सहित गेलो बोटीतून उतरून त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला  परंतु बोट पुराच्या झालेला लागल्याने किरकोळ अपघात झाला  बाका प्रसंग टळला व त्या लोकांशी फोनवर बोलून ते सुरक्षित असल्याची खात्री करून त्यांना धीर दिला व सकाळी त्यांना सोडण्यात आले खानोटा फारसा वर्दळीच्या नसलेल्या रस्त्यावर पाणी आल्याने पुरामध्ये एकूण चार लोक वाहून गेले पोलिसांच्या मदतीने व गावकर्‍यांच्या मदतीने त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने वाचू शकले नाही सकाळी गावकऱ्यांच्या मदतीने तीन शव बाहेर काढण्यात आले चौथ्या चा शोध सुरू आहे, सापडलेल्या व्यक्ती मध्ये 1) शहाजी गंगाधर लोखंडे वय 52, 2) सुभाष नारायण लोंढे वय 48, 3) आप्पासो हरिचंद्र धायतोंडे वय 56, 4) कलावती आप्पासो धायतोंडे हे चार व्यक्ती वाहून गेले होते त्यापैकी सुभाष लोंढे यांचा मृतदेह सापडला नसून शोध सुरू असल्याचे सुनिल  महाडिक यांनी सांगितले, पोलिसांनी ग्राम सुरक्षा यंत्रणा चा प्रभावी वापर केला व ग्रामस्थांची मदत घेतली व इतर सर्व खात्यांशी समन्वय ठेवून अनेक लोकांचे प्राण वाचवले सदर भागात फारशी पूरपरिस्थिती नसल्याने पूर्वतयारी नसताना सुद्धा दौंड पोलिसांनी पूर परिस्थिती व्यवस्थित हाताळली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News