माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रयत्नातुन मंजुर झालेल्या मौजे देेर्डे को-हाळे येथे सामाजिक सभागृहाचे लोकार्पण !!.


माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रयत्नातुन मंजुर झालेल्या मौजे देेर्डे को-हाळे येथे सामाजिक सभागृहाचे लोकार्पण !!.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी. 

माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या प्रत्यत्नातून मंजुर झालेल्या देर्डे को-हाळे येथील सामाजिक सभागृहाचे लोकार्पण सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष,संचालक अरूणराव येवले यांचे हस्ते पार पडले.

सन 2018-19 या वर्षातील ग्रामविकास 2515 या निधी अंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदार संघात विविध ठिकाणी सामाजिक सभागृह उभारण्यात आले. देर्डे को-हाळे येथील 10 लाख रूपये खर्चाच्या पुर्ण झालेल्या सभागृहाचे  लोकार्पण सौ स्नेहलताताई कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संचालक अरूणराव येवले यांचे हस्ते करण्यात आले, यावेळी श्री यांनी आपल्या भाषणात सांगितले, 

कोपरगाव मतदार संघाच्या  विकासाला प्राधान्य दिलेल्या सौ. स्नेहलता कोल्हे यांनी देर्डे को-हाळे गावासाठी भरीव निधी दिलेला असुन.स्मशानभूमी बैठक शेड पेव्हींग ब्लाॅक 4 लाख, बसथांबा शेड 7 लाख 65 हजार , हायमास्ट 2 लाख 60 हजार आदी कामे मार्गी लागले असल्याचे श्री येवले यांनी यावेळी सांगितले. 

याप्रसंगी माजी सरपंच साहेबराव शिंदें, दगुराव शिंदे, चंद्रभान डुबे, अशोकराव डुबे, रमेश कोल्हे, आण्णासाहेब कोल्हे, निलेश डुबे, विलास दवंगे, ज्ञानेष्वर देशमुख, संदिप डुबे, भाउसाहेब डुबे, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News