श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस उत्साहाने साजरा*


श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस उत्साहाने साजरा*

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगांव येथील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयांत १५आॕक्टोंबर हा दिवस माजी राष्ट्रपती भारतरत्न डाॕ.अब्दुल कलाम यांची जयंती दिन वाचन-प्रेरणा दिवस म्हणून उत्साहाने संपन्न झाला. श्रीमान गोकुळचंद विदयालयात भारतरत्न माजी राष्ट्रपती डाॕ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे  मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले झाले.

             या वेळी  विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी शिक्षण प्रक्रियेत वाचन प्रकल्पाचे महत्व सांगुन आजच्या डीजीटल तंत्रज्ञानामध्ये जो पुस्तक वाचेल तोच शिकेल असे स्पष्ट केले. विदयालयांचे जेष्ठ शिक्षक गायकवाड आर.बी यांनी डाॕ.अब्दुल कलाम यांच्या विविध घटनांचा संदर्भ देत त्यांच्या अग्निपंख ह्या पुस्तकाचा अभ्यास करण्याचे व मराठीचे गोरे एस.डी .यांनी डाॕ.अब्दुल कलाम यांचा जीवनपट विदयार्थांना सांगितला. ग्रंथपाल आव्हाड ए.एल यांनी विदयार्थींना विविध पुस्तकांच्या पी.डी.एफ.फाईल वितरीत केल्या.

            या प्रसंगी मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन श्री.कुळधरण बी.बी.यांनी तर आभार जेष्ठ शिक्षक श्री.रवि पाटील यांनी मानले.

          विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दिलीप अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे आदीनी वाचन-प्रेरणा दिवसांच्या विदयार्थी, शिक्षकांना  शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला जेष्ठ शिक्षक श्री.तुपसैंदर डी.व्ही, श्री.अमृतकर ए.बी, श्री.कोताडे ए.जे, श्री.एन.के.बडजाते उपस्थित होते. तसेच इतर सर्व शिक्षक व विद्यार्थी झुम मिटींग व्दारे आॕन लाईन उपस्थित  होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News