दौंड तालुक्यात मुसळधार पाऊस


दौंड तालुक्यात मुसळधार पाऊस

सुरेश बागल कुरकुंभ:प्रतिनिधी: दौंड तालुक्यातील कुरकुंभ, पांढरेवाडी, मळद, जिरेगाव आणि अन्य गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. दि.१४.१०.२०१० रोजी दिवसभर

पाऊस पडत असल्याने रात्री ७:००च्या नंतर जोरदार पाऊस झाला. मोठ्या पावसामुळे कुरकुंभ- पांढरेवाडी शारदानगरच्या जवळील पूल आणि कुरकुंभ-बारामती रोडवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद केला होता.कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कामगार कामावरून ११:००वा सुटल्यावर पुलावरून पाणी वाहत असल्याने घरी पोहोचण्यास खूप वेळ लागला.

मुसळधार पावसामुळे शेतातील झाडे पडली, वीजेचे खांब पडले, तळाच्या जवळ राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरात पाणी गेल्याने आर्थिक नुकसान झाले.

दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जिरेगाव कोठडी शिवेवर दोन वर्षापुर्वी करण्यात आलेला तलाव रात्री ११ चे सुमारास मुख्य भराव पाण्याने वाहुन गेल्या मुळे फुटला आणी तलावातील पाणी गोलांडे वस्ती ,सय्यद वस्ती ,कोल्हे वस्ती ,भंडलकर वस्ती ,शेलार मळा मार्गे रोटी नाल्या मधून भयाणक पुरपरस्थीती तयार करून मळद गावाच्या दिशेने वाहू लागले बघता बघता पाण्याने वेगाने मुस्लीम समाज कब्रस्तान  ,तलाठी व ग्रामपंचायत ऑफीस ,मारुती मंदीर ,भैरवनाथ मंदीर  जामा मस्जीद व दलीत वस्ती मधील काही परीसरा मध्ये जवळ जवळ ६ फुट उचींने वेढा घातला परंतु मळद मध्ये येताच दौंड पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक सुनील महाडीक आपल्या सहाकार्या सह पाण्याचा वेग व उंची वाढत असताना स्वतः वाहनासह मदतीला धावुन आले गाडीमधून स्पिकर मधुन सर्वांना मंदीर व मज्जीद च्या व घरांच्या स्लॅप वर बसण्याच्या सुचना देवु लागले कोणीही भिऊ नका आम्हीं तुमच्या मदतीला आहोत अशा सुचना  दिल्याने लोकांनी आपला जीव वाचवला साहेबांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतः पाण्यात उभे राहून परस्थीचा अंदाज घेवुन लोकांना मदत केली .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News