मुर्शतपूर येथील सामाजिक सभागृहाचे लोकार्पण !!


मुर्शतपूर येथील सामाजिक सभागृहाचे लोकार्पण !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या प्रत्यत्नातून मंजुर झालेल्या मुर्शतपूर येथील सामाजिक सभागृहाचे लोकार्पण सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांचे हस्ते पार पडले.

सन 2018-19 या वर्षातील ग्रामविकास 2515 या निधी अंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदार संघात विविध ठिकाणी सामाजिक सभागृह उभारण्यात आले. मुर्शतपूर येथील 10 लाख रूपये खर्चाच्या पुर्ण झालेल्या सभागृहाचे लोकार्पण उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांचे हस्ते करण्यात आले.मतदार संघाच्या विकासाला प्राधान्य दिलेल्या माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी मुर्षतपूर गावासाठीही भरीव निधी दिलेला आहे. त्यामुळे गावातील अनेक कामे मार्गी लागले आहेत.स्मशानभूमी शेड बांधकाम व पेव्हींग ब्लाॅक 15 लाख, मुस्लीम कब्रस्थान 5 लाख, स्मशानभूमी बैठक शेड 4 लाख, हायमास्ट 1 लाख 20 हजार, सामाजिक सभागृह 25 लाख आणि बसथांबा शेड तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत धारणगाव- मुर्शतपूर-जेउरपाटोदा रस्ता आदी कामे करण्यात आली आहे. अशा प्रकारचे विविध कामांना निधी देउन गावच्या विकासात भरीव मदत केली असल्याचे श्री दवंगे म्हणाले, यावेळी साहेबराव शिंदें,, रामदास शिंदें,,सुधाकर शिंदें, नाना शिंदें,,प्रकाष दवंगे, त्रंबक दवंगे,मधुकर उगले,संदीप उगले, अन्वर शेख,सखाहरी कुंदे,संदीप गुरूळे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News