जेउर कुंभारी येथे डॉ.ए पी.जे अब्दुल कलाम जयंती साजरी !!


जेउर कुंभारी येथे डॉ.ए पी.जे अब्दुल कलाम जयंती साजरी !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

देशाचे माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनानिमित्त आज जिल्हा परिषद हॅरिसन ब्रँच शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी कोव्हिड १९ च्या प्रादुर्भावामुळे जेऊर कुंभारी गावातील पवार वस्ती या ठिकाणी मुलांसमवेत सोशल डिस्टिगशन पाळत वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मुख्याध्यापक सूर्यवंशी सर यांनी वाचनाचे महत्व सांगून डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलामांची यांच्या जीवनविषयी विद्यार्थ्यांना परिपूर्ण माहिती करून दिली.त्यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यानी वाचनाचे महत्व जाणून दररोज घरी जास्तीत जास्त अवांतर वाचनाची पुस्तके तसेच अभ्यासक्रमाची पुस्तके वाचण्याचा संकल्प केला मागील महिण्यात बालभारती पुस्तक वाचन पारायणात सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन चांदेकसारे केंद्राचे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दिलीपराव ढेपले व विषयतज्ञ दहिफळे सर यांनी केले.

सदर प्रसंगी नुकतेच शाळेला प्राप्त झालेल्या छोट्या छोट्या गोष्टींच्या पुस्तकांचे (पुरक वाचन साहित्य) सलग दोन तास विद्यार्थ्यांनी सामाजिक अंतर ठेऊन वाचन केले.तसेच दिलीपराव ढेपले साहेबांनी कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर व वारंवार हात धुवून स्वच्छता पाळण्याचे विद्यार्थ्यांना सांगितले.

सदर उपक्रमात शिक्षक नवनाथ सुर्यवंशी व मनिषा शिंपी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करून मार्गदर्शन केले. हॅरीसन ब्रँच शाळेत राबविल्या जाणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांना चांदेकसारे केंद्राचे केंद्रप्रमुख निळे साहेब व गटशिक्षणाधिकारी पोपटराव काळे साहेब नेहमीच प्रोत्साहन व प्रेरणा देत असतात,असे मुख्याध्यापक नवनाथ सुर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.

          मुख्याध्यापक व शिक्षक

        जि.प.प्राथ.शाळा हॕरिसन ब्रँच

जाहिरात
Search
विडिओ
Recent News