विठ्ठल होले पुणे प्रतिनिधी :-दौंड उपजिल्हा रुग्णालय येथे कोरोना महामारी सुरू झाल्यापासून आज पहिल्यांदाच सर्वच रिपोर्ट 36 पैकी 36 निगेटिव्ह आले आहेत, ही दौंडच्या जनतेसाठी आनंदाची बाब आहे,आज दिनांक 14/10/20 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण 36जणांची rapid antigen तपासणी करण्यात आली त्यांचे report अर्ध्या तासात प्राप्त झाले.
पैकी एकूण एकाही व्यक्तीचा अहवाल positive आला नाही.तर दिनांक.13/10/20 रोजी एकूण 25 जणांचे swab rt-pcr करिता पुणे येथे पाठवण्यात आले होते
त्यांचे report आज प्राप्त झाले.
25 पैकी 10 व्यक्तीचे report positve प्राप्त झाले.Positive मध्ये महिला-- 6
पुरूष --4 प्रभाग -दौंड शहर=7
ग्रामीण=3 रुग्ण आढळले होते ते सर्व
10 ते 80 वर्ष वयोगटातील असल्याचे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले आहे.तर यवत येथील कोविड सेंटर येथे 13/10/20 रोजी 58 लोकांचे घस्यातील स्वाब तपासणी साठी पाठविण्यात आले होते, त्याचा अहवाल आज प्राप्त झाला त्यापैकी 7 लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती डॉ इरवाडकर यांनी दिली आहे, यामध्ये केडगाव -2,राहू -2,यवत -1,सहजपूर -1,नानगाव -1 असे 7 व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत,सर्वानी अशा प्रकारे काळजी घेतली तर लवकरच दौंड शहरासह तालुका कोरोना मुक्त होऊ शकतो.