भारतीय पत्रकार संघ बारामती तालुक्याची कार्यकारिणी जाहीर, कायदेशीर सल्लागारपदी ॲड. गणेश आळंदीकर तर सचिवपदी सोमनाथ लोणकर यांची निवड


भारतीय पत्रकार संघ बारामती तालुक्याची कार्यकारिणी जाहीर, कायदेशीर सल्लागारपदी ॲड. गणेश आळंदीकर तर सचिवपदी सोमनाथ लोणकर यांची निवड

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

भारतीय पत्रकार संघाच्या बारामती तालुका कार्यकारिणीची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. भारतीय पत्रकार संघाचे बारामती तालुका अध्यक्ष काशिनाथ पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक घेण्यात आली. यामध्ये भारतीय पत्रकार संघाच्या सचिवपदी सोमनाथ लोणकर तर कायदेशीर सल्लागारपदी ॲड. गणेश आळंदीकर यांची निवड करण्यात आली.

  भारतीय पत्रकार संघाच्या बारामती तालुका संघटकपदी महंमद शेख, सहसचिवपदी संतोष भोसले, कोषाध्यक्षपदी बाळासाहेब वाबळे, वृत्तवाहिनी प्रमुखपदी असिफ शेख,  पत्रकार हल्ला कृती समिती प्रमुखपदी निखिल नाटकर तर कार्याध्यक्षपदी अमोल चौधर यांची निवड करण्यात आली आहे.

        भारतीय पत्रकार संघाचे बारामती तालुका अध्यक्ष काशिनाथ पिंगळे, उपाध्यक्ष विनोद गोलांडे यांच्या हस्ते कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News