अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेविकांचेच आरोग्य आठ दिवसापासून मेलेल्या कुत्र्याच्या दुर्गंधीने धोक्यात आले असताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोरख दळवी यांनी परिसराची पहाणी करुन तातडीने जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधून मेलेल्या कुत्र्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था केली. (छाया-साजिद शेख-नगर)
जिल्हा रुग्णालयाचा बेजबाबदारपणा
अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - कोरोनाच्या संकटकाळात आपल्या जीवावर खेळून नागरिकांना आरोग्यसेवा देणार्या अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेविकांचेच आरोग्य धोक्यात आले होते. मागील आठ दिवसापासून मेलेला कुत्रा आरोग्य सेविकांच्या वसतीगृहाच्या आवारात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. या परिसराची संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोरख दळवी यांनी पहाणी करुन तातडीने जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधून मेलेल्या कुत्र्याची विल्हेवाट लावण्यात आली.
जिल्हा रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे आरोग्य सेविकांचेच आरोग्य धोक्यात आले होते. याची दखल घेत सदर प्रश्न सोडविण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्यांनी बुधवार दि.14 ऑक्टोबर रोजी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. तर मेलेल्या कुत्र्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था केली. जिल्हा रुग्णालयातील आवारामध्ये यापुढे कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा केल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने संबधीत अधिकार्यांना काळे फासण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सोमनाथ गायकवाड, राजू आंग्रे, सादिक शेख, सोमनाथ कारले आदी उपस्थित होते.