फिनिक्सने 78 गरजू ज्येष्ठ नागरिकांचे जीवन केले प्रकाशमान!! 78 गरजू ज्येष्ठ नागरिकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी जागतिक अंध दिनाचा उपक्रम


फिनिक्सने 78 गरजू ज्येष्ठ नागरिकांचे जीवन केले प्रकाशमान!!  78 गरजू ज्येष्ठ नागरिकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी  जागतिक अंध दिनाचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नागरदेवळे येथे जागतिक अंध दिनानिमित्त घेण्यात आलेल्या शिबीराच्या माध्यमातून 78 गरजू ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या. दीनदुबळ्या, कामगारवर्ग व आर्थिक दुर्बल घटकांना या शिबीराच्या माध्यमातून मोठा आधार मिळाला. तर दृष्टीदोष असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना नवदृष्टी मिळाली असून, शस्त्रक्रियेनंतर ते घरी परतले. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेत असलेल्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या चेहर्‍यावर समाधान होते. 

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवरील टाळेबंदी काळात फिनिक्स सोशल फाऊंडेशन सर्वसामान्य रुग्णांसाठी आधार ठरला असून, टाळेबंदीत गरजू रुग्णांची गरज ओळखून शहरासह ग्रामीण भागात मोठ्या धाडसाने विविध शिबीरे घेण्यात आली. मागील पाच महिन्यात कोरोना काळात नियमांचे पालन करुन झालेल्या शिबीराचा अनेक गरजूंनी लाभ घेतला आहे. दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींचे जीवन प्रकाशमान करण्याचे कार्य फिनिक्स फाऊंडेशनचे चालू आहे. त्याचबरोबर नेत्रदानसह अवयवदान चळवळीची देखील जनजागृती सुरु आहे. फाऊंडेशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला असल्याचे जालिंदर बोरुडे यांनी म्हंटले आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटल व के.के. आय बुधराणी यांचे सहकार्य लाभले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News