विठ्ठल होले, पुणे प्रतिनिधी -- रांजणगाव हद्दीतील सराफ दुकानदार श्रवण सिंग मोहब्बत सिंग परमार राहणार अमरदीप सोसायटी कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे हे दिनांक 15/9/2019 रोजी त्यांचे मंगलमूर्ती ज्वेलर्स नावाचे सोन्याचे दुकान बंद करून दुकानातील विक्री करता असलेले 882 ग्रॅम 736 मिलि वजनाचे सोन्याचे दागिने व दिवस दिवसभरात झालेल्या धंद्याची रोख रक्कम 40,000/- रुपये असे एकूण 27,55,780/- रुपयांचा माल घेऊन त्यांचे कामगारांसह घरी येत असताना त्यांचे मोटार सायकल ला पांढऱ्या रंगाचे कारणे पाठीमागून धडक देऊन अपघात करून त्यांना खाली पाडले त्यावेळी त्यांची बाजूला पडलेली काळे रंगाची सॅक पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी उचलून चोरून नेलीवगैरे मजकूर चे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. दि 13/10/2020 रोजी मा.पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख सो. पुणे ग्रामीण व मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री मिलिंद मोहिते यांचे आदेशानुसार व मा.पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेत असताना रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान रांजणगाव पोस्टे गु.र.न. 309/2019 भा.द.वि. कलम 394 ,411, 34 या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी नामे संतोष अनिल गायकवाड,वय 28 रा. धानोरा,ता. आष्टी जि. बीड सध्या रा.खंडोबा मंदिराजवळ रांजणगाव ता. शिरूर जि. पुणे हा रांजणगाव येथे असल्याबाबत गोपनीय बातमी दारा कडून माहिती मिळाल्याने सदर ठिकाणाहून त्यास ताब्यात घेतले असून पुढील कारवाई कावमी रांजणगाव पोस्टच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरचा आरोपी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.सदरची कारवाई सहा. फौजदार दत्तात्रय गिरमकर, सहा. फौजदार दयानंद लिम्हण,पो हवा उमाकांत कुंजीर,पो. ना. राजू मोमीन, पो. ना. जनार्दन शेळके यांनी केली आहे.