दौंड शहरात घन कचऱ्याचा प्रश्न गहन,जनावरे रस्त्यावर,पावसामुळे पसरते दुर्गंधी,मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला


दौंड शहरात घन कचऱ्याचा प्रश्न गहन,जनावरे रस्त्यावर,पावसामुळे पसरते दुर्गंधी,मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला

विठ्ठल होले पुणे प्रतिनिधी :-

- दौंड शहरातील कचऱ्याचा प्रश्न गहन होत चालला आहे, कचरा कुंड्या कचऱ्याने ओसंडून वाहत आहेत,आणि त्यावर  मोकाट जनावरे जमा होऊन रस्त्यावर गर्दी होत आहे, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे, गेल्या कित्येक दिवसापासून कचऱ्याचा प्रश्न उपस्थित होत आहे, या कचऱ्याच्या कालावधीत दोन मुख्याधिकारी बदलून गेले पण कचरा जैसे थे आहे,कोरोना महामारी मुळे अगोदरच जनता हैराण असताना कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे इतर आजारांना निमंत्रण मिळत आहे, आणि लोक कोरोना मुळे दवाखान्यात जाण्यास घाबरत आहेत,लोकवस्तीच्या ठिकाणी या कचरा कुंड्या ठेवलेल्या आहेत,तर राजधानी हॉटेल च्या मागच्या बाजूला भाजी मंडई शेजारी मोकाट जनावरे जमा झाले आहेत, खाद्य शोधण्यासाठी तेथील कुंडी पलटी झाली आहे, दौंड गोपाळवाडी रोड वर या कुंड्या असून रहदारीचा रस्ता असल्यामुळे तेथे अपघात वाढले आहेत,महिला चालकांचे अपघात होत आहेत, शेजारी दवाखाना आहे तेथे पेशन्ट आणि नातेवाईकांची वर्दळ असते,सरपंच वस्ती परिसरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे,रात्रीच्यावेळी ते कुत्रे दुचाकी चारचाकी गाडी मागे धावतात त्यामुळेही अपघात होत आहेत, या कडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देऊन कचरा,मोकाट जनावरे,मोकाट कुत्रांचा उपद्रव थांबवला पाहिजे अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News