16 नियमावलीसह नवरात्र उत्सव साजरे करण्याची परवानगी, नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरे करा - पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक


16 नियमावलीसह नवरात्र उत्सव साजरे करण्याची परवानगी, नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरे करा - पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक

विठ्ठल होले पुणे प्रतिनिधी,:

-- दौंड पोलीस ठाण्यात नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षांची उत्सव साजरा करण्याविषयी मिटिंग संपन्न,पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी केले मार्गदर्शन.कोरोना महामारीमुळे कोणतेही सण उत्सव साजरे करता आले नाहीत,त्याच पद्धतीने शनिवार पासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवावरही कोरोना चे संकट कायम आहे, कोरोना मुळे येणारे नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्यात यावेत याविषयी ही मिटिंग घेण्यात आली, त्यामध्ये नियम लागू करण्यात आले आहेत, या 16 नियमांच्या अधीन राहून सर्व अध्यक्ष यांनी नवरात्र उत्सव साजरा करण्यात यावा,नियम पुढील प्रमाणे राहतील,1)मंडळ अध्यक्षांनी सदर महापालिका,नगरपालिका,ग्रामपंचायत यांची रीतसर परवानगी घेणे आवश्यक.2)मा न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच स्थानिक प्रशासन यांनी सुसंगत मंडप धोरण स्वीकारून मर्यादित मंडप टाकण्यात यावा.3)कोरोना महामारीमुळे गर्दी न करता मूर्तीची स्थापना, सजावट साध्या पद्धतीने करावी,4)देवीची मूर्ती मंडळासाठी 4 फूट तर घरगुती मूर्ती 2 फुटाची असावी,5)या वर्षी शक्यतो घरातील धातू किंवा संगमरवर 

 च्या मूर्तीची पूजा करावी,मूर्ती शाडूची/पर्यावरण पूरक असावी आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवून कृत्रिम ठिकाणी विसर्जित करावी,6)उत्सवासाठी वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिली तरच घ्यावी,जाहिरात करताना गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, सामाजिक तसेच आरोग्य विषयक संदेश द्यावेत,माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेबद्दल जनजागृती करावी,7) गरबा,दांडिया इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नये,आरोग्य विषयक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत उदा.रक्तदान शिबीर आरोग्य विषयक माहिती,इतर आजारांविषयी जनजागृती करण्यात यावी,8)आरती,भजन, कीर्तन हे धार्मिक कार्यक्रम घेताना गर्दी होऊ नये याची काळजी घ्यावी, ध्वनी प्रदूषण बाबत तरतुदींचे,नियमांचे पालन करावे,9)देवीच्या दर्शनासाठी केबल नेटवर्क,ऑनलाईन,वेबसाईट,फेसबुक द्वारे इत्यादींचा जास्तीत जास्त वापर करावा,10) देवीच्या मंदिरात,मंडपात निर्जंतुकीकरण तसेच थर्मल स्क्रिनिंग व्यवस्था करण्यात यावी, प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी  सामाजिक अंतर,मास्क लावणे,सॅनिटाईझर चा वापर करणे या सुविधा उपलब्ध करून देणे,11) देवीच्या आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढू नये,विसर्जन ठिकाणी होणारी आरती घरीच करावी,लहान मुले, जेष्ठ नागरिक यांना सुरक्षेच्या कारणास्तव तेथे घेऊन जाऊ नये,चाळीतील/इमारतीतील देवीची मिरवणूक एकत्रित काढू नये,12) महापालिका,विविध मंडळ,गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी,स्वयंसेवी संस्था यांनी प्रत्येक प्रभागात कृत्रिम विसर्जन तलाव तयार करून गर्दी होण्यापासून टाळावी,13) मंडपात पाच पेक्षा जास्त कार्यकर्ते असू नये तसेच तेथे खाद्यपदार्थ,पेयजल आणू नये,14)विसर्जन दिवशी प्रतिबंधित क्षेत्रातील मूर्ती  सार्वजनिक ठिकाणी विसर्जित करता येणार नाहीत,15)दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम सर्व नियम पळून  प्रतिकात्मक स्वरूपाचा असावा,दाहनाच्या वेळी किमान व्यक्तीच तेथे हजर असतील,प्रेक्षक बोलवू नये,त्यांना फेसबुक द्वारे दर्शन दयावे,16)कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन,आरोग्य,पर्यावरण,वैदयकीय शिक्षण विभाग तसेच महापालिका,पोलीस, स्थानीक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील,या परिपत्रकानंतर किंवा उत्सव सुरू होण्याच्या मधल्या काळात अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्याचे अनुपालन करणे आवश्यक आहे.अशा नियमावलीचे पालन करून नवरात्र उत्सव साजरे करण्यात यावेत,असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी केले आहे. यावेळी दौंड शहरासह परिसरातील नवरात्र मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News