भाजपचा राज्यसरकार, तालुक्यातील लोकप्रतिनिधी विरोधात इंदापूर तहसिलवर निषेध मोर्चा.


भाजपचा राज्यसरकार, तालुक्यातील लोकप्रतिनिधी विरोधात इंदापूर तहसिलवर निषेध मोर्चा.

आता महाविकास आघाडीे सरकारचाच पंचनामा करण्याची वेळ : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची खरमरीत टीका.

भाजपचा राज्यसरकार, तालुक्यातील लोकप्रतिनिधी विरोधात तहसिलवर निषेध मोर्चा. 

श्री . काकासाहेब मांढरे इंदापूर प्रतिनिधी ( दि. १३ऑक्टोंबर ) :

राज्यातील महाविकास आघाडीचे  सरकार हे महिलांवरील अत्याचार रोखणे, कोविड रुग्णांना सुविधा देणे, कर्जमाफी योजना, शेती पिकांना नुकसान भरपाई देणे, मराठा आरक्षण आदी सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले आहे, असा आरोप करत जनतेला फसवून सत्ता स्थापन केलेल्या या तीन पक्षांच्या या बिघाडी सरकारचाच पंचनामा करण्याची वेळ आल्याची खरमरीत टीका राज्याचे माजी मंत्री तथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली.भाजपच्या वतीने राज्यभर राज्यसरकारच्या विरोधात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि.१२ रोजी इंदापूर तहसिल कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते.त्याप्रसंगी ते बोलत होते.या प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी आघाडी सरकार व इंदापूरच्या लोकप्रतिनिधींच्या निष्क्रीयतेवर जोरदार हल्ला चढविला.

ते म्हणाले की,राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे,असे असताना येथील सत्ताधारीच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आम्हांस न्याय द्या,म्हणून प्रशासनाकडे निवेदने द्यावी लागतात.मोर्चा काढावा लागतो.तर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे काय हाल होत असतील? असा सवाल करत हे राज्य सरकारच्या निष्क्रियतेचेच उदाहरण असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. अधिकाऱ्यांच्या बदल्या १५ जून नंतर करु नयेत असा नियम असताना सुद्धा राज्य सरकार हे सध्या बदल्या करुन भ्रष्टाचार करीत असल्याचा खळबळजनक आरोप श्री. पाटील यांनी यावेळी केला. 

 ते पुढे म्हणाले की, इंदापूर तालुक्यात प्रशासनाचा काहीही दोष नाही, दोष हा येथील निष्क्रिय लोकप्रतिनिधींचा असल्याची टीका करत  प्रशासनानेही आपले काम  निःपक्षपणे करुन जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा विरोधी पक्ष म्हणून आम्ही वेळप्रसंगी आक्रमक भूमिका घेवू असा इशाराच हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी दिला. तालुक्यात कोरोनाची परिस्थिती ही गंभीर असताना  ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व इतर आरोग्य सुविधा देण्यास लोकप्रतिनिधी अपयशी ठरले असल्याचे त्यांनी सांगितले. इंदापूरात शासन कोरोना रुग्णांना बेडशीट देऊ शकत नाही. मात्र दुसरीकडे या कोरोनाच्या कालावधीमध्ये तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे राज्यमंत्री असलेल्या वन खात्याकडून तालुक्यातील जनतेच्या घरावर बुलडोझर फिरवून जनजीवन उध्दवस्त करण्याचे काम चालु असल्याचा घणाणात हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केला. 

तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे बांधकाम खात्याचे राज्यमंत्री असूनही रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत.यामुळे तालुक्यातील एका युवकाला आपला जीव गमवावा लागल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पालखी मार्गासाठी निधी दिला आहे, मात्र गोखळी ते लुमेवाडी दरम्यान जाणूनबुजून भरपाई संदर्भात नोटीस देण्यात विलंब लावला जात असल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला.या मोर्चाच्या वेळी इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष शरद जामदार, मारुती वणवे, तानाजी थोरात, माऊली चवरे,शीतल साबळे, उज्वला घोळवे आदी पदाधिकारी यांची भाषणे झाली. हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते तहसीलदार सोनाली मेटकरी यांना निवेदन देण्यात आले.या मोर्चात तालुक्यातील सर्व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते  सहभागी झाले होते.

 : विभागीय आयुक्तांना भाजप नेते भेटणार : हर्षवर्धन पाटील.

   अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकांचे त्वरित पंचनामे करुन शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, यासह इतर मागण्यांसाठी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ.अभिनव देशमुख यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खा.गिरीष बापट व मी स्वतः आज (सोमवारी ) पुण्यात भेट घेणार असल्याची माहिती यावेळी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News