कोविड रुग्णांसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय सज्ज !! संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.


कोविड रुग्णांसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय सज्ज !! संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

सुरु होणाऱ्या सर्व सुविधायुक्त कोविड रुग्णालयाची पाहणी करतांना आमदार आशुतोष काळे.

शुक्रवार (दि.१६) रोजी कोविड केअर सेंटर होणार सुरु – आमदार आशुतोष काळे

कोपरगाव तालुक्यातील कोरोना बाधित गंभीर रुग्णांची उपचारासाठी होत असलेली ससेहोलपट थांबविण्यासाठी काही दिवसांपूर्वी आपल्या विकास निधीतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला १६ ऑक्सिजन बेड,२ व्हेंटीलेटर व २ बायपॅप मशीन तसेच कोविड रुग्णालयासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य दिले आहे. सर्व वैद्यकीय उपकरणे बसवून कार्यान्वित करण्यात आली आहेत. सर्व सुविधायुक्त कोविड रुग्णालयाचे संपूर्ण काम जवळपास पूर्णत्वास आले असून कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय सज्ज झाले असून शुक्रवार (दि.१६) रोजी सदर कोविड केअर सेंटर सुरु होणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

                       कोपरगाव तालुक्यात दैनदिन वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या व अत्यवस्थ कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर उपलब्ध होत नसलेले ऑक्सिजन बेड त्यामुळे अनेक गंभीर रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. याची दखल घेवून आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात सर्व सुविधायुक्त कोविड रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय घेवून आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर, बायपॅप मशीन आदी वैद्यकीय उपकरणांसाठी आमदारनिधी खर्ची घातला असून या कोविड केअर सेंटरच्या सुरु असलेल्या कामाची आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच पाहणी केली. सर्व उपकरणे सुरु झाल्याची खात्री  करून माहिती जाणून घेत आरोग्य विभागाने अत्यंत कमी वेळात रुग्णालय उभारणी केल्याबद्दल आरोग्य विभागाचे कौतुक केले. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा चांगला फायदा होत आहे. कोपरगाव शहर व तालुक्यात प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यासाठी रॅपिड टेस्ट केल्या जात आहे. त्यामुळे शेवटच्या कोरोनाबाधित रुग्णांपर्यंत आरोग्य विभाग पोहोचला असून बाधीत रुग्णांवर वेळेत उपचार होवून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत असून बाधित रुग्ण कमी होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आपण कोरोनावर यापूर्वी वर्चस्व मिळविले आहे मात्र जून महिन्यापासून सुरु झालेला अनलॉक व शिथिल करण्यात आलेल्या अटींमुळे रुग्ण वाढणे साहजिक आहे. मात्र अशा परिस्थितीत नागरिकांनी आजपर्यंत केलेले सहकार्य यापुढेही ठेवावे व कोरोनाला न घाबरता काळजी घ्यावी असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, नगरसेवक वीरेन बोरावके, मंदार पहाडे, सुनील शिलेदार, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, डॉ. अजय गर्जे, हाजी महेमुद सय्यद, डॉ. तुषार गलांडे, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, डॉ. कृष्णा फुलसुंदर, डॉ. सौ. वैशाली बदडे, डॉ. आप्पासाहेब आदिक, डॉ. संदीप वैरागळ आदी उपस्थित होते.जाहिरात
Search
विडिओ
Recent News