पिपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आत्मनिर्भर सामाजिक न्यायासाठी पुढाकार


पिपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने  शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आत्मनिर्भर सामाजिक न्यायासाठी पुढाकार

ताबा गुंठा, हरित क्रांती शेत रस्ता व पाझर पूर कालव्याचा प्रस्ताव

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - पिपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने सरकार शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यास असमर्थ ठरत असताना आत्मनिर्भर सामाजिक न्यायासाठी पुढाकार घेतला आहे. आत्मनिर्भर सामाजिक न्यायाच्या माध्यमातून घरकुल वंचित, शेतकरी व दुर्बल घटकांचे प्रश्‍न सोडविण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

महाराष्ट्रात पंतप्रधान आवास योजना कार्यान्वीत झालेली नसल्याने घरकुल वंचितांना घरांचे दाखविण्यात आलेले स्वप्न भंगले आहे. मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने अनेक आंदोलन करुन केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधून पाठपुरावा करण्यात आला. मात्र त्याला यश आलेले नाही. सरकारी अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यात रस नाही. यासाठी संघटनेने पुढाकार घेऊन आत्मनिर्भर सामाजिक न्यायातंर्गत ताबा गुंठा योजना कार्यान्वीत केली आहे. शहरालगत असलेल्या गावांमधील खडकाळ पड जमीनी घेऊन त्यावर ले आऊट प्लॅन टाकून घरकुल वंचितांचा प्रश्‍न सोडविण्यात येणार आहे. घरकुल वंचितांना कमी किंमतीत 1 गुंठा जमीन देऊन जागा मालक शेतकर्‍यांना खडकाळ पड जमीनीच्या मोबदल्यात मोठा फायदा करुन दिला.जाणार आहे. याचप्रमाणे लघु उद्योगासाठी औद्योगिक वसाहती देखील निर्माण करण्याचा संघटेना संकल्प आहे. याद्वारे बेरोजगार युवकांना किमान 5 गुंठे जमीन प्रकल्प उभारण्यासाठी दिली जाणार आहे. हे सर्व सहकारी संस्थेच्या माध्यमातून नियमाप्रमाणे केले जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच देशात हरित क्रांतीचा प्रयोग झाल्यानंतर शेतीमध्ये अनेक सुधारण्या झाल्या. शेतीचे उत्पादन वाढले. मात्र सध्या अनेक शेतामध्ये जाण्यासाठी योग्य रस्ते नसल्याने पाऊस आल्यानंतर शेतामध्ये जाता येत नाही. पिके घेता येत नाही व योग्य पध्दतीने देखभाल देखील करता येत नाही. शेतीमधला माल बाजारपेठेत घेऊन जाण्यासाठी अनेक प्रश्‍न निर्माण होतात. यासाठी हरित क्रांती शेत रस्ता व पाझर पूर कालवा ही मोहिम संघटनेच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. राज्य सरकारकडे या संदर्भात प्रस्ताव सादर केला जाणार आहे. अर्थशास्त्रज्ञ डॉ.व्ही.म. दांडेकर यांनी पाझर पूर कालवा प्रस्ताव सरकारला दिला होता. मात्र याकडे सरकारने गांभीर्याने पाहिले नाही. शिवारातील ओढे, नाले उकरुन त्याचे पाझर पूर कालव्यात रुपांतर केल्यास भूजलपातळी वाढणार आहे. यामुळे बागायती क्षेत्र वाढून शेती व शेतकर्‍यांची सर्वांगीन प्रगती साधली जाणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. आत्मनिर्भर सामाजिक न्यायासाठी अ‍ॅड. गवळी, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, कॉ.बाबा आरगडे, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, अ‍ॅड. लक्ष्मण पोकळे, भगवान जगताप, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे आदि प्रयत्नशील आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News