संततधार व अतिवृष्टी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यात यावा


संततधार व अतिवृष्टी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यात यावा

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

१) शेवगाव तालुक्यात गेल्या काही दिवसापासून रेसततधार व अतिवृष्टी पाऊस बरसल्याने नदी नाल्यांना पूर आला.तालुक्यातील विविध भागात शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले, शेतीला छोट्या तळ्याचे स्वरूप आले. त्यामुळे पिके पाण्याखाली गेली यात प्रामुख्याने मुंगी हातगाव  बोधेगाव कांबी या  भागांमध्ये तर खूप नुकसान झाले असून, मुग,कपाशी, तूर, सोयाबीन, इ.पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याबरोबरच अनेक घराची पडझड झाली आहे.

२)या वर्षी वेळेवर आवश्यक* तेव्हा तेवढा पाऊस पडल्याने खरिपाची पिके अगदी जोमात आली होती. परंतु सततधार पावसाने शेतकऱ्यांच्या या आनंदावर विरजण घातले आहे.हाताशी काढणीला आलेले मुगाचे पीक आडवे पडले असून, मुगाच्या परिपूर्ण झालेले वाळलेल्या शेंगांना कोंब फुटून उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच कपाशीचे पाने सुद्धा पिवळी पडली आहेत याचा परिणाम पात्यावर होत असून, कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.

३)तालुक्यात मोठ्या प्रमाणात डाळिंबाच्या बागा आहेत. यावर्षी दोन महिन्यातच पावसाने सरासरी ओलांडली आहे. एवढा पाऊस डाळिंब पिकाला सहन होत नाही तसेच जून महिन्यामध्येच "तेल्या" रोग आल्याने डाळिंबाची फळे फुटून जमिनीवर पडू लागले यामुळे फळांचा रंग काळा पडला असून त्यानंतर डांबर्या, बुणकी, बुरशी या आलेल्या रोगाने 80 टक्के माल(डाळिंब) खराब झाला त्यामुळे मातीमोल भावाने विकावा लागला आहे. त्यात औषध फवारणी व खत विक्रेते दुकानदार यांची उधारी खर्चसुद्धा वसूल झाला नाही.

४)तालुक्यात सर्वत्र शेतकरी* चिंताग्रस्त झाला असून आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मा.साहेबांनी पिक विमा कंपनी प्रतिनिधी, कृषी विभाग तसेच तलाठी, मंडळ अधिकारी यांना तात्काळ आदेश देऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा दिलासा तात्काळ देण्यात यावा, अन्यथा शेतकरी बांधवांच्या हितासाठी छावा क्रांतिविर सेना व शेतकरी बांधवामार्फत आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News