कोकमठाण ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या नुतन इमारतीचे काम प्रगतीपथावर !!


कोकमठाण ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या नुतन इमारतीचे काम प्रगतीपथावर !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोकमठाण गावच्या वैभवात भर पडणार : - सरपंच,पोपटराव पवार

कोपरगाव तालुक्यातील प पू रामदासी महाराज यांच्या सहवासाने पुनित झालेल्या कोकमठाण येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीचे काम प्रगतीपथावर असून सदरची इमारत पूर्ण झाल्यास गावच्या वैभवात नक्कीच भर पडणार असल्याचे सरपंच पोपटराव पवार यांनी सांगितले.

तालुक्यातील  कोकमठाण येथील लोकसंख्या मोठया प्रमाणात असून गावाची रचनाही विस्तीर्ण वाडया वस्त्यावर विखुरलेली आहे. जागतीक किर्तीचे देवस्थान असलेल्या जंगली महाराज यांचा आश्रमही याच ग्रामपंचायत हददीत येतो. या ग्रामपंचायतीच्या कार्यालयाची दुरावस्था झालेली असल्याने याठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम करण्याचे ग्रामपंचायतीने निश्चित केले. त्यानुसार सन 2019-20 च्या जनसुविधा योजनेअंतर्गत रूपये 9 लाख आणि 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून या कामासाठी सुमारे 9 लाख असा 18 लाख रूपयाचा निधी उपलब्ध करण्यात येउन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शरदराव थोरात यांच्या हस्ते व  ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत  या इमारतीच्या कामाचे 2 महिन्यापुर्वीच भुमिपूजन करण्यात आले ,सध्या सदर इमारतीचे काम सुरू असून आज हे काम प्रगतीपथावर आहे.

माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या प्रयत्नातून या गावासाठी विविध विकासकामांसाठी  मोठया प्रमाणात निधी दिला त्यामुळे आमच्या गावातील अनेक कामे मार्गी लागले, नुकतीच सौ कोल्हे यांच्या प्रयत्नातून मंजुर झालेली कोकमठाण पुरक  पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाली असून कोकमठाण गावठाण आणि वाडया वस्त्यांवरील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. गेल्या काही वर्षापासुन भेडसावत असलेल्या विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सौ कोल्हे यांनी 33 केव्ही सबस्टेशन मंजूर करून आनले ते कार्यान्वित झाले आहे याबरोबरच रस्त्यांची कामेही मोठया प्रमाणात झाले असून माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे  यांच्या प्रेरणेतूनच ग्रामपंचायत कार्यालयाचे काम हाती घेतले असल्याचे सरपंच पोपटराव पवार यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News