कोरोनाची दौंड शहरात विश्रांती कायम,आढळले चारच रुग्ण,यामध्ये दौंड पोलिसांचा सिंहाचा वाटा


कोरोनाची दौंड शहरात विश्रांती कायम,आढळले चारच रुग्ण,यामध्ये दौंड पोलिसांचा सिंहाचा वाटा

विठ्ठल होले पुणे प्रतिनिधी :

-- दौंड शहरात शनिवार रविवार सुट्टी असताना सोमवारी फक्त 64 जणांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये शहरात तीन तर ग्रामीण भागात एक रुग्ण  आढळला आहे,त्यामुळे मागील काही दिवसांपासून कोरोना ने विश्रांती घेतली आहे,परंतु यामध्ये प्रामुख्याने दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक  यांचा सिंहाचा वाटा आहे, त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह चोख बंदोबस्त ठेवला त्यामुळे हे बऱ्याच अंशी शक्य झाले आहे ,दौंड शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर पोलीस बंदोबस्त ठेवून दंडात्मक कारवाई केली, ग्रामीण भागात देखील विनाकारण बाहेर फिरणारे डबल,ट्रीपल सीट फिरणारे,विना मास्क,विना लायसन फिरणारे यांच्या वर कारवाई करून जरब बसवली आणि त्याचाच आज फायदा होतो आहे,लोकांनी कारवाईच्या भितीमुळे का होईना शासनाच्या नियमांचे पालन केले आणि दौंड शहरासह ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात आला आहे.आज दिनांक 12/10/20 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण 64 जणांची rapid antigen तपासणी करण्यात आली त्यांचे report अर्ध्या तासात प्राप्त झाले पैकी एकूण 4 व्यक्तीचे अहवाल positive आले आहेत तर 60 व्यक्ती चे report negative आले आहेत. 

Positive मध्ये महिला-- 1,पुरूष --3,प्रभाग -दौंड शहर=3

 ग्रामीण=1 हे चारही व्यक्ती 28 ते 55 वर्ष वयोगटातील असल्याचे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले आहे.डॉ संग्राम डांगे यांचा कोविड योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला आहे,उपजिल्हा रुग्णालय दौंड डॉक्टर,कर्मचारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक रासगे,डॉ सुरेखा पोळ,डॉ राजेश पाखरे,डॉ रुपाली पाखरे,डॉ वाघमोडे,डॉ पत्की,डॉ गुजर,डॉ बनसोडे,डॉ इरवाडकर,डॉ शिवानी पांचाळ,डॉ कांबळे,डॉ मिलिंद कांबळे,डॉ पिर्जादे,आरोग्य सेविका शिंदे,पोळ,खेडकर,मोमीन शेख तसेच इतर सिस्टर या सर्वांनी मिळून केलेली सेवा यामुळे कोरोना शहरातून,तालुक्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.सर्व जनतेने घाबरून न जाता असेच शासनाचे नियम पाळून व्यवहार करणे गरजेचे आहे त्यामुळे काही दिवसात शहरात पुन्हा एकदा सामान्य जीवन जगणे सोपे जाईल असे मत पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी व्यक्त केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News