खाजगी शाळांची वाढीव फी कोणीही भरु नये..नितीन भुतारे


खाजगी शाळांची वाढीव फी कोणीही भरु नये..नितीन भुतारे

विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंध केल्यास संबधित शाळेंच्या चेअरमन व मुख्याध्यापक यांच्या तोंडाला मनसे काळे फासणार.

अहमदनगर( प्रतिनिधी संजय सावंत) अहमदनगर शहर व जिल्ह्यात खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची मनमानी पुन्हा सुरु झाली असुन विद्यार्थ्यांना ऑनलाईन टेस्ट, ऑनलाईन शिक्षणापासुन वंचित ठेवण्याचे प्रकार काही शाळां मध्ये जिल्ह्यात सुरु असुन फि नाही भरलेल्या विद्यार्थ्यांची  ऑनलाईन परिक्षा घेतली जात नाही असे मनसे कडे आलेल्या अनेक विद्यार्थी व पालकांच्या तक्रारी मधुन समोर आले आहे. 6 महिने पुर्ण होऊन गेले असुन शाळांमध्ये 3 री ते 10 पर्यंत फक्क्त ऑनलाईन शिक्षण चालु असुन शाळा संपुर्ण फि भरण्या करीता पालकांवर दबाव टाकत आहेत. आज शाळेत कुठल्याही प्रकारचे कॉम्प्युटर शिक्षण चालु नाही, शाळेतील कुठलीही स्टेशनरी वापरली जात नाही,कुठलिही बस चालु नाही, कुठलेही स्नेहसंमेलनाचे कार्यक्रमाचे आयोजन नाही,कुठलेही खेळाचे सराव,स्पर्धांचे आयोजन सुरु नसताना या सर्व फि शाळा पालकांना भरण्यास सांगत आहे. व फि भरली नाही तर प्रथम सत्राच्या परिक्षा सुरु असुन त्या मध्ये या विद्यार्थ्यांना शाळेच्या  व्हाट्स अॅप ग्रुप मधुन काढण्याचे प्रकार संबधित विद्यार्थ्याला परीक्षेची लिंक न पाठवणे ऑनलाईन शिक्षण लिंक मधुन बाहेर काढणे असे प्रकार सुरु असलयाचे पालकांनी मनसेच्या नितीन भुतारे यांना सांगितले असुन संबधित तक्रार करनारया पालकांनी फि भरण्याच्या पावती मनसे कडे जमा केल्या आहेत. तसेच 2 री  पर्यंत ऑनलाईन शिक्षण सुरु नसतांना देखील या संबधित पालकांना फि चा तगादा काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी लावला आहे व फि न भरल्यास आपल्या विद्यार्थ्याला पुन्हा आहे त्याच वर्गात पुढच्या वर्षी प्रवेश घ्यावा लागेल असे सांगण्यात येत आहे. हा सर्व प्रकार मनसेच्या समोर आल्या नंतर या सर्व विषयांवर शिक्षणअधिकारी प्राथमिक व माध्यमीक यांना मनसेचे जिल्हाध्यक्ष्य सचिन डफळ यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले तसेच लवकरात लवकर वरील सर्व वाढीव कम्प्यूटर,स्टेशनरी,बस,स्नेहसंमेलन,प्रयोगशाळा,खेळांची फि व ईतर फि  रद्द करुन फक्त शिकवणी फि घेण्यात यावी असे आदेश आपन सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळांना द्यावेत अशी मागणी करण्यात आली. तसेच कुठलाही विद्यार्थी परिक्षा व शिक्षणा पासुन वंचित राहु नये याची आपन काळजी घ्यावी कुठलाही विद्यार्थी परिक्षा व ऑनलाईन शिक्षणा पासुन वंचित राहिल तर मनसे संबधित शाळांच्या  चेअरमन, संचालक व मुख्यध्यापकांच्या तोंडाला काळे फासनार असा ईशारा मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी दिला आहे. व कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय झाल्यास त्या पालकांनी 7304612121 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे अवाहन नितीन भुतारे यांच्या व मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News