बांधकाम कामगारांना संजय निराधार योजनेचा व पिवळे रेशनकार्ड अश्या विविध मागण्यांसाठी तहसीलदारां निवेदन…


बांधकाम कामगारांना संजय निराधार योजनेचा व पिवळे रेशनकार्ड अश्या विविध मागण्यांसाठी तहसीलदारां निवेदन…

श्रीगोंदा :प्रतिनिधि,अंकुश तुपे, श्रीगोंदा तालुक्यात हजारोच्या संख्येने बांधकाम कारागीर व मजूर कार्यरत आहेत.मात्र,तालुक्यातून थोड्याच  कामगारांची कामगार कल्याण कार्यालयाकडे नोंद करण्यात आली आहे.उर्वरित बांधकाम कामगार शासनाच्या व प्रशासनाच्या विविध योजनांपासून दुर्लक्षित राहिलेले आहेत.साधारण ८० टक्के कामगार हे अशिक्षित आहेत.यांना गेल्या एक वर्ष्यापासून नोंदणी करण्यास सांगितली आहे.मात्र,संबंधित कार्यालायात नोंदणी झालेल्या कामगारांना,पाच वर्षे नोंदणी लागू असल्याचे सांगितले जात आहे.एक वर्ष पूर्ण होताच,पुन्हा कागदपत्रे मागवीत,पुन्हा नोंदणी करण्यासाठी भाग पाडले जात आहे.या सर्व जाचक अटींमुळे,कामगार अत्यंत बिकट परस्थितिला सामोरे जात आहेत.यामुळे श्रीगोंदा तहसीलदार यांना कामगारांनी निवेदन देऊन निदान आपल्या मार्फत सर्व गोष्टीचा विचार करून प्रत्येक नोंदणीकृत कामगारास संजज गांधी योजना व पिवळे रेशन कार्ड,आपल्या कडील सर्व योजनेचा कामगारांना लाभ मिळून द्यावा अश्या सर्व बाबी शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी,कामगारांच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन  श्रीगोंद्याचे तहसीलदार यांना देत,भावना शासनापर्यंत पोहचवण्याची विनंती यावेळी निवेदकांनी केली आहे.

कामगारांसाठी जे ओळखपत्र दिले आहे.त्यात योजनांची भरमार आहे,मात्र,प्रत्यक्षात कोणत्याही योजनेची अमलबजावणी होत नाही.श्रीगोंदा तालुक्यात अंदाजे ५००० कामगार आहेत.त्यांच्यासाठी श्रीगोंद्यात स्वतंत्र कार्यालय असावे.अन्यथा,जिल्हा ठिकाणी स्वतंत्र कर्मचारी टेबल असावा.सुरक्षा कीट सर्व कर्मचाऱ्यांना पोहचले नाहीत.ज्यांना पोहचले,त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागले आहेत.त्यासाठी कीट श्रीगोंद्यात देण्याची व्यवस्था करावी.बऱ्याच कामगारांना लॉकडाउन मध्ये मदत मिळाली आहे.पण काहीं वंचित राहिले आहेत मात्र, तालुक्यातील कामगारांनी सर्व बाबींची पूर्तता करूनही,ते सर्व योजनांपासून उपेक्षित राहिले आहेत.कामगार आजारी पडल्यास अद्याप त्यांच्यासाठी कोणतेही रुग्णालय निश्चित करण्यात आलेले नाही.तालुक्यातील सर्व कामगारांचा सर्व्हे करण्यात यावा.तशेच,काम करत असतांना,कामगारांना सुरक्षा संच पुरवण्यात यावा. एखाद्या कामगाराचा कामा दरम्यान अपघाती मृत्यू झाल्यास.त्यास आर्थिक सहाय्य मिळावे. त्याचबरोबर कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जिम्मेदारी शासनाने घ्यावी.या आणि विविध मागन्यांसाठी आज श्रीगोंदा तहसीलदार यांना हे निवेदन सादर करन्यात आले आहे.यावर तात्काळ कारवाई करवी.अन्यथा,लागलीच व्यापक आंदोलन करणार असल्याचे आंदोलकांनी निवेदनात नमुद केले आहे.

तसेच संबंधित तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री,आ.बच्चू कडू (कामगार राज्य मंत्री),पालक मंत्री अहमदनगर, कामगार आयुक्त अहमदनगर, खा-सुजय विखे  यांना प्रत पाठउन तसे लेखी पत्रान्वये निवेदकांना कळवावे. या निवेदनावर नितीन रोही(प्रथम शहरध्यक्ष प्रहार),बाळू दांडेकर,धनु दांडेकर,बंडू कुदळे,भिमा कोठारे, अजय काळे सुखदेव कोठारे,गणेश ससाणे, विश्वास सुडगे, नितीन कांबळे, शरद औटी,संदीप पोकळे सह अनेक कामगारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बांदकाम कामगार नोंदणी फि फक्त८५रुपये असताना ऑनलाइन नोंदणी जे लोक करत आहेत, ते कामगारांकडून२००ते३००रुपये घेऊन लूटमारी करत आहे, त्यांनी ही लूटमारी बंद करावी अन्यथा कारवाई सामोरे जावे-नितीन रोही(बांदकाम कामगार)

जाहिरात
Search
विडिओ
Recent News