महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर !!


महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव भाजपा महिला आघाडीच्या वतीने तहसिल कार्यालयसमोर आंदोलन

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चाललेला आहे.महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार,अत्याचार,विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. त्यातच कोरोना महामारी सारख्या अतिसंवेदनशील काळातही कोविड सेंटर व हाॅस्पिटलमध्ये महिलावरील अत्याचार आणि विनयभंग सुरूच आहे.यासाठी राज्य सरकारने  महिला सुरक्षितते संदर्भात कडक कायदे करावेत,  या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीने आज कोपरगाव येथील तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या या आंदोलनाप्रसंगी तालुकाध्यक्ष योगिता होन,शहराध्यक्ष शिल्पा रोहमारे, माजी उपसभापती वैशाली साळुंके,आदीसह महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.यावेळी नायब तहसिलदार मनिषा कुलकर्णी यांनी निवेदन स्वीकारले. महाराष्ट्र प्रदेश,भारतीय जनता पार्टी,महिला मोर्चाने या महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेचे गांभीर्य ओळखून सदर घटनांचा पाठपुरावा केलेला आहे.पीडीत महिलांच्या कुटूंबियांनी स्थानिक पोलीस स्टेशनला भेट देउन वेळोवेळी कारवाईची मागणीही केलेली आहे.परंतु सदर घटनासंदर्भात सरकारला गांभीर्य नसल्याचे दिसून आले.यावरून या महाविकास आघाडी सरकारची महिला सुरक्षितेबाबतची असंवेदनशीलता आणि निष्क्रियता दिसून येते.या सरकारचा प्रशासनावर देखील अंकुश नसल्यामुळे प्रशासनदेखील महिलांच्या अत्याचारांच्या घटनांना गांभीर्याने घेत नाही.

महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे महाराष्ट्रात सातत्याने महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहे. कोरोना उपचार केंद्रातही महिलांवर अत्याचार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार महिलांचे रक्षण करण्यात पुर्णपणे अपयशी ठरले असून या आघाडी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत,महाविकास आघाडी सरकारने महिलाविषयीची बेफिकीरीचा दृष्टीकोन सोडून महिला सुरक्षिततेबाबत त्वरीत कडक कायदे बनविण्यात यावे,अशी मागणीही यावेळी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा कार्यकारणी सदस्या विनिता भिंगारे, अलका परजणे, निकिता चौधरी, पंचायत समिती सदस्या सुनीता संवसरकर, राजश्री कोळपकर, नगरसेविका दीपा गिरमे, मंगल आढाव, विद्या सोनवणे, सुवर्णा सोनवणे, ताराबाई जपे, कांचन दरपेल, मंजूश्री गोयल आदींसह भारतीय जनता पार्टी चे जिल्ह्या व तालुक्यातील पदाधिकारी उपस्तीत होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News