शहीद वीर जवान सुनील वलटे यांचे बलिदान देश विसरणार नाही – आमदार आशुतोष काळे


शहीद वीर जवान सुनील वलटे यांचे बलिदान देश विसरणार नाही – आमदार आशुतोष काळे

शहीद वीर जवान नायब सुभेदार सुनील वलटे यांच्या स्मारकाचे अनावरण प्रसंगी त्यांचे कुटुंबीय व आमदार आशुतोष काळे.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

          देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असतांना कोपरगाव तालुक्याचे सुपुत्र वीर जवान नायब सुभेदार सुनील वलटे मागील वर्षी अतिरेक्यांबरोबर झालेल्या चकमकीत शहीद झाले. त्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानातून व त्यांनी दाखविलेल्या शौर्याची तरूण पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी दहेगाव बोलका ग्रामस्थांनी त्यांचे स्मारक उभारले हे खरोखर अभिमानास्पद आहे.शहीद वीर जवान नायब सुभेदार सुनील वलटे यांच्या बलिदानामुळे कोपरगाव तालुक्याने शूर भूमिपुत्र गमावला असून त्यांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

             कोपरगाव तालुकयातील दहेगाव बोलका ग्रामस्थांच्या वतीने बांधण्यात आलेल्या शहीद वीर जवान नायब सुभेदार सुनील वलटे यांच्या स्मारकाचे अनावरण प्रसंगी आमदार आशुतोष काळे यांनी शूरवीर वलटे यांना स्मृतिदिनानिमित्त पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव ग्रामपंचायतीच्या वतीने शहीद जवान वलटे यांच्या कुटूंबियांना ५०,००० रुपयांचा धनादेश आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल कटके, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,विरपिता रावसाहेब वलटे,वीरमाता सौ. सुशीलाताई वलटे,वीरपत्नी मंगलताई वलटे,भाऊ अनिल वलटे, मुलगा वेदांत वलटे, जगन बागल,अनिल वलटे,अशोक भोकरे,भास्कर वलटे,रावसाहेब आभाळे, गुलाबराव देशमुख,आबा रक्ताटे व ग्रामस्थ उपस्थित होते.

      - 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News