पळशी परिसरात पावसाने कांदा पिकांचे नुकसान


पळशी परिसरात पावसाने कांदा पिकांचे नुकसान

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

बारामती तालुक्‍यातील पश्‍चिम जिरायती पट्ट्यात गेली तीन दिवस पावसाने कहर केला असून पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसाचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

लोणी भापकर, पळशी, मासाळवाडी, सायंबाचीवाडी, वाकी, मोराळवाडी, कानाडवाडी, तरडोली, मुर्टी, मोरगाव या परिसरातील शेतकऱ्यांनी कांद्याची लागण मोठ्या प्रमाणात केलेली आहे. या अगोदरच्या पावसाने आधी लागण केलेले कांदे गेले होते,  पण पुन्हा दुसऱ्यांदा लागण केलेले कांदेही या पावसाने जातील अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

  या परिसरात सर्वत्र पाऊस मोठया प्रमाणात झाला आहे. पावसाचे पाणी शेत शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात साचून राहील्याने कांद्याचे पीक तसेच ज्वारीचे पीक जळून जाण्याची शक्यता आहे. यंदा पावसाळ्यात सुरुवाती पासूनच पाऊस चांगला पडत असून उन्हाळ्यात पाणी कमी पडणार नाही असं मत पळशी येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News