शिक्षकांच्या अडचणी संदर्भात अरुण गाडे केंद्रीय अध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ यांचा पश्चिम महाराष्ट्र व मुंबई मंत्रालय दौरा जाहीर, गौतम कांबळे यांची माहिती


शिक्षकांच्या अडचणी संदर्भात अरुण गाडे केंद्रीय अध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ यांचा पश्चिम महाराष्ट्र व मुंबई मंत्रालय दौरा जाहीर, गौतम कांबळे यांची माहिती

विठ्ठल होले पुणे, प्रतिनिधी --- याबाबत सविस्तर माहिती देताना श्री गौतम कांबळे राज्य महासचिव कास्ट्राईब शिक्षक आघाडी म्हणाले की मा .अरुणभाऊ गाडे केंद्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ यांचा पश्चिम महाराष्ट्र पुणे व  मंत्रालय मुंबई दौरा नियोजित करण्यात आलेला आहे .सोमवार दिनांक 12 / 10 / 2020 रोजी पुणे येथे  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी व संध्याकाळी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे .

दिनांक 13 व 14 /10 / 2020 रोजी मुंबई दौरा आयोजित करण्यात आला आहे .यामध्ये मा .उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री , मा . हसन मुश्रीफ ग्रामविकासमंत्री मा . राजेश टोपे आरोग्यमंत्री व मा .जितेंद्र आव्हाड कामगार मंत्री यांच्या नियोजित भेटी आहेत .तसेच मा .शरद पवार साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांचीही या दौऱ्यात भेट घेणार आहेत .व कर्मचाऱ्यांच्या अडचणी संदर्भात चर्चा करणार आहेत .तसेच मंत्रालयातील सर्व विभागाचे प्रधान सचिव व मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव यांच्या भेटी घेऊन कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात निवेदन देऊन चर्चा करण्यात येणार आहे  व बुधवारी संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्स करण्यात येणार आहे .

त्यामुळे सभासदांनी आपल्या अडचणी लेखी स्वरुपात संघटनेकडे पाठवाव्यात अशी सूचना सभासदांना श्री .गौतम कांबळे राज्य महासचिव

कास्ट्राईब शिक्षक आघाडी यांनी केली आहे .यावेळी श्री दादा डाळिंबे,श्री चंद्रकांत सलवदे,श्री शंकर घोडे,श्री विनायक कांबळे ,श्री जयवंत पवार , श्री सुनील रुपनवर, श्री विजय जाधव,श्री संतोष ससाने ,श्री आप्पा जगताप श्री हौशीराम गायकवाड,श्री रवींद्र अहिवळे ,श्री दुर्योधन चव्हाण,श्री राजेंद्र गायकवाड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News