फिनिक्स फौंडेशनच्यावतीने जागतिक अंध दिनानिमित्त मोफत नेत्रतपासणी शिबीर संपन्न : 21 नागरिकांचा नेत्रदानाचा संकल्प


फिनिक्स फौंडेशनच्यावतीने जागतिक अंध दिनानिमित्त मोफत नेत्रतपासणी शिबीर संपन्न : 21 नागरिकांचा नेत्रदानाचा संकल्प

कोरोना महामारीतही शिबीरात सातत्य ठेवणे हे आदर्शवत - मनोज कोतकर

नगर (-प्रतिनिधी संजय सावंत) कोरोनाच्या काळात आरोग्य सेवेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. कोरोना व्यतिरिक्त रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी बरीच धावपळ करावी लागत, त्यामुळे अनेक सर्वसामान्य, गोर-गरीबांचे हाल झाले. अशा परिस्थितीतही जालिंदर बोरुडे यांनी फिनिक्स फौंडेशनच्या माध्यमातून मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेऊन गोर-गरीबांना दिलासा देण्याचे काम केले आहे. आज परिस्थितीत सर्वसामान्य होत असली तरी ही अखंड सेवा आजही सुरु आहे. एखाद्या कार्यात सातत्य असणे ही खूप कठिण गोष्ट आहे, परंतु जालिंदर बोरुडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून हे सातत्य कायम ठेवले आहे. ही एक आदर्शवत बाब आहे. ते करत असलेल्या कार्यास मनपाच्या माध्यमातून सहकार्य राहील, असे प्रतिपादन मनपा स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी केले.

फिनिक्स फौंडेशनच्यावतीने नागरदेवळे येथे जागतिक अंध दिनानिमित्त आयोजित मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घाटन मनोज कोतकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी फिनिक्सचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, फुले ब्रिगेडचे दिपक खेडकर, वैभव दानवे, राजेंद्र बोरुडे, बाबासाहेब धिवर, अतुल थोरात, आठवले आदि उपस्थित होते.याप्रसंगी जालिंदर बोरुडे म्हणाले, आज आरोग्य सेवा महाग होत आहे, अशा परिस्थितीत गोर-गरीबांना उपचार मिळावे, यासाठी फिनिक्स फौंडेशन कार्यरत आहेत. नियमित शिबीराच्या माध्यमातून मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया करुन अंधांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचे काम सुरु आहे. कोरोनाच्या काळातही या मोफत शिबीरात खंड पडू न देता शासकीय नियमांचे पालन करुन शिबीरे सुरु आहेत. 

या शिबीरात डॉ. राहुल बोडखे,  माया आल्हाट, आसिफ शेख, मनिषा कोरडे, मिरा पटारे  यांनी 273 रुग्णांची तपासणी केली यामधून  78 जणांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी 21 नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने नेत्रदानाचा संकल्प केला.  यावेळी कोरोनाच्या जनजागृतीविषयी जागृती करण्यात आली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब धीवर यांनी केले तर राजेंद्र बोरुडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी    कुणाल बडगु,  सौरभ बोरुडे, गोकुळ गिलचे, गौरव बोरुडे आदिंसह फिनिक्स फौंडेशनचे पदाधिकारी व नागरदेवळे येथील ग्रामस्थ उपस्थित होेते. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व शासकीय नियम पाळण्यात आला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News