दौंड शहरासह तालुक्यात रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट,ठीक होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली


दौंड शहरासह तालुक्यात रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट,ठीक होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी ---- दौंड शहरासह तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे,जनतेने अशीच काळजी घेतली तर लवकरच दौंड तालुका कोरोना मुक्त होईल असे मत डॉ संग्राम डांगे यांनी व्यक्त केले आहे. दिनांक 9/10/20 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण 67जणांची rapid antigen तपासणी करण्यात आली त्यांचे report अर्ध्या तासात प्राप्त झाले

पैकी एकूण 11व्यक्तीचे अहवाल positive आले आहेत तर 56व्यक्ती चे report negative आले आहेत. Positive मध्ये 

महिला-- 6,पुरूष --5,प्रभाग -

दौंड शहर=5,ग्रामीण=6 असे 11 जण पोझिटीव आले आहेत हे सर्व जण 33  ते  60 वर्ष वयोगटातील असल्याचे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले आहे. तर तालुक्यातील परिस्थिती चांगली आहे,10/10/2020 रोजी यवत येथे 81 लोकांचे घस्यातील स्वाब घेण्यात आले होते,त्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत, त्यापैकी 10 जण नव्याने कोरोना बाधीत आले असल्याचे डॉ इरवाडकर यांनी सांगितले आहे.त्यामध्ये यवत 4, कासुर्डी 1,गलांडवाडी 2,हांडाळवाडी 1, दहिटने 2, हे सर्वजण 29 ते 60 वर्ष वयोगटातील असून त्यामध्ये 8 पुरुष असून 2 महिलांचा समावेश आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News