टाकळी कडेवळीत गांजा लागवडीवर छापा


टाकळी कडेवळीत गांजा लागवडीवर छापा

अंकुश तुपे, श्रीगोंदा प्रतिनिधी दि.१० :

टाकळी कडेवळीत ता. श्रीगोंदा येथील गट नं-७ मधील धोंडीबा गणपत सोनवणे यांच्या घराच्या पाठीमागे लागवड केलेल्या गांजाच्या शेतीवर श्रीगोंदा पोलिसांनी छापा टाकला व सुमारे ३७,५०० रुपयांची ३० झाडे जप्त केली.

     याबाबत सविस्तर माहिती अशी की पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांची शिर्डी येथे बदली झाल्याने त्यांच्या जागेवर नुकतेच कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून अण्णासाहेब जाधव रुजू झाले आहेत. अण्णासाहेब जाधव यांना खबऱ्याने माहिती दिली की टाकळी कडेवळीत ता. श्रीगोंदा येथील गट नं-७ मध्ये धोंडीबा गणपत सोनवणे यांच्या घराच्या पाठीमागे गांजाची झाडे लावली आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांना कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार दौलतराव जाधव यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांचे पथक कारवाईसाठी पाठवले. पोलीस हवालदार मांडगे, इंगवले, सुपेकर, घोडके, बेल्हेकर, जंगम, जाधव हे कारवाईत सहभागी झाले. छापा टाकल्यानंतर सोनवणे यांच्या घराच्या पाठीमागे ३० गांजाच्या झाडांची बेकायदेशीर लागवड केल्याचे आढळले. सुमारे ३७,५०० रुपये किंमत असलेल्या गांजाच्या झाडांचा पंचनामा करून झाडे जप्त केली.याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        तहसीलदार प्रदीप पवार, तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ मस्के, पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ही कारवाई केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News