सणासुदीच्या काळात बाजारपेठीतील दुकानांना रात्री 9 पर्यंत वेळ वाढवून देण्याची मागणी


सणासुदीच्या काळात बाजारपेठीतील दुकानांना रात्री 9 पर्यंत वेळ वाढवून देण्याची मागणी

मोची व सारडा गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) सणासुदीचे दिवस लक्षात घेता शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजार, मोची गल्ली, सारडा गल्ली येथील सर्व दुकानांना रात्री 9 वाजे पर्यंत वेळ वाढवून देण्याच्या मागणीचे निवेदन मोची व सारडा गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना ईमेलद्वारे पाठविण्यात आली असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष मन्सूर शेख यांनी दिली.

कोरोनाच्या संकटकाळात टाळेबंदीनंतर सर्वच व्यवसाय व दुकानदार आर्थिक अडचणीत सापडले आहे. लवकरच नवरात्र व दिवाळी हे महत्त्वाचे सण सुरु होणार आहे. या सणा निमित्ताने बाजारपेठ पुर्वपदावर येण्याची आशा आहे. मात्र महापालिका व पोलीस प्रशासनाकडून संध्याकाळी 7 वाजता सर्व दुकाने बंद करण्यास सांगितले जात आहे. अन्यथा दुकानांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. शहरातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व दुकाने, शॉपिंग मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स यांना सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत खुली राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासंबंधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे येथील आयुक्तांनी आदेश काढले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.पुणे शहराप्रमाणे अहमदनगर मध्ये जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी शहरातील मुख्य बाजारपेठ सणासुदीच्या दिवसात सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत सुरु राहण्यासाठी वेळ वाढविण्यासंदर्भात आदेश देऊन शहरातील सर्व व्यापारी व दुकानदारांना दिलासा देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर कापड बाजार, मोची गल्ली व सारडा गल्ली येथील व्यापारी व दुकानदारांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News